Download App

हाथरस घटना; भोले बाबांचे 6 निकटवर्तीय जेरबंद…

हाथरस घटनेप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी भोले बाबांच्या 6 निकटवर्तीयांना जेरबंद केलं असल्याची माहिती आयजी शलभ माथूर यांनी दिलीयं.

Image Credit: Letsupp

Hathras stampede : हाथरस घटनेप्रकरणी ( Hathras stampede) उत्तर प्रदेश पोलिसांनी भोले बाबांच्या 6 निकटवर्तीयांना जेरबंद केलं असल्याची माहिती आयजी शलभ माथूर यांनी दिलीयं. या प्रकरणी जेरबंद केलेल्यांमध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.

कॉंग्रेस-आपची युती संपुष्टात? दिल्ली आणि हरियाणामध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा

हाथरसमध्ये आयोजित केलेल्या सत्संग समितीमध्ये जेरबंद केलेल्या 6 जणांचा समावेश होता. याआधीच्या काळातही त्यांनी अनेक सत्संगचे आयोजन केलेले आहे. राम लडैते पुत्र रहबारी सिंह यादव (मैनपुरी), उपेंद्र सिंह यादव पुत्र रामेश्वर सिंह (फिरोजाबाद), मेघसिंह पुत्र हुकूम सिंह (हाथरस), मुकेश कुमार पुत्र मोहर सिंह (हाथरस), मंजू यादव पत्नी सुशील कुमार (हाथरस), मंजू देवी पत्नी किशन कुमार यादव (हाथरस) अशी जेरंबद केलेल्यांची नावे आहेत.

अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवेंचं निलंबन मागे, शिवीगाळ प्रकरणात झाली होती कारवाई

या घटनेप्रकरणी वेद प्रकाश मधुकर याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. भोले बाबांच्या अटकेबाबत शलभ माथूर यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. काही लोकांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीयं. पुढील चौकशीत काही निष्पन्न झाल्यास ज्यांचा सहभाग असेल त्यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याचं माथूर यांनी स्पष्ट केलंय. भोले बाबा यांच्यावर आगरा पोलिस ठाण्यात 2000 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाथरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची परवानगी भोले बाबांच्या नावे काढण्यात आलेली नसल्याचं शलभ यांनी सांगितलंय.

नेमकं काय घडलं?
एटा आणि हाथरस या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांचा शेकडो एकर परिसरामध्ये सत्संग आयोजित करण्यात आला होता. धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ भाविकांचा मृत्यू झाला असून, १५० पेक्षा अधिकजण जखमी झालेत. या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींना एटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

follow us

वेब स्टोरीज