किंकाळ्या अन् आक्रोश.. विदारक दृश्य पाहून शिपायाला हार्ट अटॅक; हाथरसचा सुन्न करणारा रिपोर्ट
Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काल एका सत्संगा दरम्यान (Hathras Stampede) चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत दीडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या सत्संगाचे (Uttar Pradesh) आयोजन करणाऱ्या संस्थेने येथे पुरेशी व्यवस्था केली नव्हती. या घटनेत महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाला लोकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर भाविक बाहेर पडत असतानाच गोंधळ उडाला आणि ही हृदयद्रावक घटना घडली. चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की यात अनेकांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयात मृतदेहांचा खच पडला. सर्वत्र किंकाळ्या अन् आक्रोश ऐकू येत होता. विदारक दृश्य पाहून एटा सरकारी रुग्णालयातील शिपायाला हार्ट अॅटॅक आला. यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर फरार झालेला बाबा नारायण साकार हरी उर्फ भोलेबाबा मैनपुरी येथील त्याच्या घरी पोहोचला होता. येथे त्याचा आश्रम आहे. आता येथील ट्रस्टमध्ये पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली असून या सत्संगाचे आयोजन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सत्संगमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये वाढ; १२२ वर मृतांची संख्या, १५० पेक्षा अधिकजण जखमी
गुप्तचर विभागातील नोकरी सोडून बनला भोलेबाबा
नारायण साकार हरी असे या भोलेबाबाचे खरे नाव आहे. हा बाबा एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी गावाचा रहिवासी आहे. याच गावात त्याचे प्राथमिक शिक्षण झाले होते. गुप्तचर विभागात त्याने नोकरी केली होती. पुढे 1990 मध्ये मात्र नोकरी सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर त्याने नाव बदलून साकार विश्व हरी असे नवे नाव धारण केले.
कार्यक्रम आटोपल्यानंतर भोलेबाबा त्याच्या कारमध्ये बसून निघाला असताना अनुयायांनी त्याच्या दर्शनासाठी पळण्यास सुरुवात केली. या बाबाचे पाय जिथे जिथे पडले तेथील माती घेण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठी दरी होती. मागील बाजूने गर्दीचा लोंढा आला त्यामुळे दबाव वाढला त्यामुळे लोक त्या दरीकडे झुकू लागले. त्यामुळे जे खाली पडले त्यांच्यावर आणखी लोक येऊन पडले हा सिलसिला असाच सुरू राहिला.
भोलेबाबांच्या सत्संगात मृत्यू तांडव; शंभरहून अधिक जणांचा गेला जीव, महिलांची संख्या सर्वाधिक
रस्त्याच्या बाजूला शेत होते. या शेतात पाणी भरले होते. चिखलही होता. पळण्याच्या नादात लोक चिखलात फसून पडले. लोकांच्या गर्दीत खाली पडलेले लोक या चिखलातच दबले गेले. त्यामुळे श्वास गुदमरुन अनेकांचा मृत्यू झाला. येथेही मृतदेहांचा खच पडला होता. या कार्यक्रमात 80 हजार लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यापेक्षाही हा आकडा कितीतरी जास्त होता.