सत्संगमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये वाढ; १२२ वर मृतांची संख्या, १५० पेक्षा अधिकजण जखमी

सत्संगमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये वाढ; १२२ वर मृतांची संख्या, १५० पेक्षा अधिकजण जखमी

UP Hathras stampede incident : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात फुलराई मुघलगडी (सिकंदराराऊ ठाणा) येथे काल मंगळवारी धार्मिक सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ भाविकांचा मृत्यू झाला असून, १५० पेक्षा अधिकजण जखमी झालेत. (Hathras ) या मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. (Religious Satsang) अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. (UP) सर्व जखमींना एटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा १२२ पर्यंत पोहोचला आहे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माऊलींच्या पालखीचे भक्तांना मंत्रमुग्ध करणारे दिवेघाटातील विहंगम दृश्ये, पाहा फोटो

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

एटा आणि हाथरस या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांचा शेकडो एकर परिसरामध्ये सत्संग आयोजित करण्यात आला होता अशी माहिती अलिगड रेंजचे महानिरीक्षक शलभ माथूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बाबा पळाले भक्त अडकले?

फुलराई मुघलगडी येथे साकार हरी बाबांच्या एक दिवसीय सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. पावणेदोनच्या सुमारास हा सत्संग संपल्यानंतर शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडायला सुरूवात केली. यावेळी बाबांच्या सेवादारांनी भाविकांना रोखून धरलं होतं. आधी साकार हरी बाबा यांच्या ताफ्याला सोडण्यात आलं. ऊन लागत असल्याने अनेक भाविकांनी येथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली. या रेटारेटीमध्ये अनेकजण बेशुद्ध पडले आणि त्यामध्येच अनेकजणांचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया सव्वा लाख भाविक, प्रवचन अन् अचानक चेंगराचेंगरी, शंभरहून अधिक मृत्यू, हे आहे खरे कारण

हाथरसमधील दुर्घटनेचं वृत्त ऐकून मला दुःख झालं. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. जखमींना लवकर आराम पडो अशी प्रार्थना करते.

– द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

या दुर्घटनेबाबत मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पीडितांना सर्वोतपरी मदत करण्यात येईल. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

यूपी सरकारने हाथरसमधील पीडितांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही मदत आणि बचाव कार्यासाठी पुढाकार घ्यावा. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.

– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते लोकसभा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज