जालन्याकडे येत असलेल्या रक्कम पोलिसांनीच लुटली; तीन कोटी घेतले अन् कागदावर दीड कोटीच दाखवले

Hawala Misappropriation Case in MP- पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई झाली आणि ते थेट घरी बसले.

Ten Cops, Including Woman SDOP, Suspended in ₹1.5-Crore Hawala Misappropriation Case in MP

Ten Cops, Including Woman SDOP, Suspended in ₹1.5-Crore Hawala Misappropriation Case in MP

Hawala Misappropriation Case in MP: लोकांची सुरक्षा करणे, त्यांचा संपत्तीची सुरक्षा करण्याचे काम पोलिसांचे असते. परंतु सोन्याचे दागिने, रोकड बघितल्यानंतर कारवाई करताना पोलिसांची नियत फिरते. अशीच घटना घडलीय. हवाला प्रकरणात (Hawala) पोलिसांनी एका वाहनातून तीन कोटींची रक्कम पकडली. पण ही रक्कम पाहून डीवायएसपीसह पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचाऱ्यांची नियत फिरली. त्यांनी यातील अर्धी रक्कम गायब करत कारवाईत केवळ दीड कोटींची रक्कम जप्त केल्याचे दाखविले. परंतु तक्रार झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

मला आमदार होऊ द्यायचं नव्हत त्यांनी मी मंत्री झालो…, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर कदमांचं ट्वीट

पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई झाली आणि ते थेट घरी बसले. ही घटना घडली मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात. ही रक्कम येत होती महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात. (Hawala Misappropriation Case in Ten Cops, Including Woman SDOP, Suspended)

कोण-कोण अधिकारी-कर्मचारी घरी गेले

हे प्रकरण घडलंय सिवनी येथे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक पूजा पांडे, बंडोलचे पोलीस उपनिरीक्षक अर्पित भैरम, सिवनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील रवींद्र उईके, जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, चालक रितेश, नीरज राजपूत यांच्यासह दहा जणांना अशी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर मध्य प्रदेश पोलिस दलात प्रचंड गदारोळ उडाला आहे. या प्रकरणी आता उत्तरस्तरीय चौकशीचे आदेश पोलिस महानिरीक्षक प्रमोद वर्मा यांनी दिलेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण
मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रातील जालनाकडे एका कार जात होती. या कारमध्ये एका सराफ व्यापाऱ्याचे सुमारे तीन कोटी रुपये होते. रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिस उपअधीक्षक पूजा पांडे व पोलिस निरीक्षक भैराम यांनी तपासणीसाठी कार अडविले. पैशाने भरलेली बॅग जप्त करण्यात आली. गाडीचालकाला ताब्यात घेतले. परंतु सकाळी कारवाई दाखविण्यात आली. त्यात 1 कोटी 45 लाख रुपयांची जप्ती दाखविण्यात आली. पण उर्वरित अर्धी रक्कम ही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याचा आरोप आहे. नागपूरमधील सोहन परमान यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
तक

कारवाईची माहिती वरिष्ठांनी दिलीच नाही
एेवढी मोठी कारवाई केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतेही माहिती दिली नाही. एेवढेच नाही तर बुधवारी कारवाई झाल्यानतंर गुरुवारी रात्रीपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. माध्यमांनी ही कुणकुण लागताच काही प्रतिनिधींना याची विचारणा केली. पण पोलिस अधिकाऱ्यांनी काहीच माहिती दिली नाही. त्यानंतर अॅडशिनल एसपी दीपक मिश्रा हे पोलिस उपअधीक्षक कार्यालयात आले, त्यांनी प्राथमिक चौकशी करत तपास सुरू केला आहे.

Exit mobile version