Download App

Japan Rain : जपानमध्ये आभाळ फाटलं! 15 ठिकाणी भूस्खलन, 20 नद्यांना महापूर, प्रशासनाचे घरे सोडण्याचे आदेश

Japan Rain : जपानमध्ये आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 15 ठिकाणी भूस्खलन तर तब्बल 20 नद्यांना महापूर आल्याची माहिती समोर आली आहे. तर जपानमध्ये आजही ढग फुटणार असल्याची शक्यता जपान हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांना घरे सोडून सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. (heavy rainfall reported in japan in first week of july millions evacuated amid rivers overflowing and landslides)

प्रशासनाच्या माहितीनूसार जपानमध्ये शनिवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. जपानच्या शिमाने आणइ इजुमो भागांत 109 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मात्सु प्रांतात 95.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जपान प्रशासनाकडून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

तुम्ही सर्व परत या, मी अन् जयंतराव बाहेर पडतो; आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

जपानच्या इजुमोमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने 15 ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. तर याच भागात 20 नद्यांना महापूर आला असल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आजही जपानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने या पार्श्वभूमीवर इजुमो आणि शिमाने प्रांतातील सुमारे 3.70 लाख नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

अवघे काहीचं तासं उरले आहेत; ‘आशाएं’ गाण बॅकग्राउंडला लावत गांगुलीचं ट्विट….

जपान देश कायमच नैसर्गिक आपत्तींचा बळी असतो. जपानमध्ये कधीकाळी त्सुनामी तर कधी चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींचं संकट कायमच जपान देशावर उभं ठाकत असतं. अशातच आता यंदाच्या पावसाचं मोठं संकट जपानसमोर उभं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जपानच्या कुसुमोटो शहरातील 3.60 लाख नागरिकांना हलवण्याच्या सूचना जपान प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, आत्तापर्यंत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अद्यापतरी कोणती जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नसून जीवित हानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना घरे सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Tags

follow us