Download App

गुजरातमध्ये पावसाचे थैमान, पुरात म्हशी, गाड्या गेल्या वाहून, धक्कादायक VIDEO व्हायरल

  • Written By: Last Updated:

Gujarat flood : गुजरातमध्ये पावसाने (Rain) अक्षरश: थैमान घातलं आहे. सतत पाऊस पडत असल्यानं अनेक भागात पूरस्थिती (flood) निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुनागढ आणि नवसारी येथे पावसामुळे महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. इथले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असून त्यात जनावरे व गाड्या वाहून जात आहेत. हा व्हिडिओ अतिशय थरारक असून तो पाहिल्यानंतर पाऊस किती भयंकर कोसळतोय, याचा अंदाज येतो. (Heavy rains in Gujarat flood situation buffaloes cars washed away in flood)

चार तासात 13 इंच पाऊस झाल्याने नवसारी जिल्ह्यात पूर आला आहे. सखल भागातील घरांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. रस्ता बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. गिरनार आणि दातार पर्वतावर मुसळधार पाऊस असल्यानं कालवा पूर आला आहे. या पूराचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात अनेक जनावरे वाहून जातांना दिसत आहेत. यावेळी अनेजण आरडाओरड करत आहेत. पण पाण्याचा प्रवाह इतका आहे की, कुणीच या म्हशींना वाचवू शकत नाही.

जुनागढमध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुनागडमध्ये सकाळी 6 ते 8 या वेळेदरम्यान जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी जुनागड जिल्ह्यातील मांगरोळमध्ये 8.9 इंच पाऊस झाला. मालियाहाटिनात 6.2 इंच, वेरावलमध्ये 4.2 इंच आणि सुत्रपाडामध्ये 2.7७ इंच पावसाची नोंद झाली. तर हवामान खात्याने आज भावनगर, नवसारी आणि वलसाडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

INDW vs BANW: खराब अंपायरिंगवर हरमनप्रीत संतापली! तिसऱ्या वनडेनंतर केले गंभीर आरोप 

गिर सोमनाथ, जुनागड, राजकोट जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुजरातमध्ये एवढा पाऊस झाला आहे की घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसात रस्त्यावरील वाहने बुडाली आहेत. शहराला समुद्राचे स्वरूप आलं आहे. सर्वत्र पाणीच पाणी असून जनजीवन ठप्प झाले आहे. एकीकडे नदीला पूर आला तर दुसरीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं प्रशासनासमोरील आव्हाने वाढली आहेत. दरम्यान, या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Tags

follow us