INDW vs BANW: खराब अंपायरिंगवर हरमनप्रीत संतापली! तिसऱ्या वनडेनंतर केले गंभीर आरोप

  • Written By: Published:
INDW vs BANW: खराब अंपायरिंगवर हरमनप्रीत संतापली! तिसऱ्या वनडेनंतर केले गंभीर आरोप

INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यावर प्रतिक्रिया दिली. खराब अंपायरिंगवर तीने नाराजी व्यक्त केली. काही निर्णयांवर ती खूश नसल्याचे हरमनप्रीतने सांगितले. तीने अंपायरिंग अत्यंत वाईट असल्याचे म्हटले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळला गेला. (Indw-vs-Banw Harmanpreet Kaur Says Pathetic Umpiring Against Bangladesh 3rd Odi)

या सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अंपायरिंगचा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अंपायरिंगसाठी आधीच तयार असू. मी याआधीही सांगितले होते की येथे अत्यंत खराब अंपायरिंग आहे. काही निर्णयांवर मी आनंदी नाही.

हरमनप्रीतही बांगलादेश क्रिकेटवर नाराज दिसत होती. ती सामना संपल्यानंतर म्हणाली, “आपल्या देशाचा उच्चायुक्त देखील येथे आहे, मला वाटले की तुम्ही त्यांना आमंत्रित कराल.” पण हरकत नाही.” हरमनप्रीतने बीसीसीआय टीमचे आभार मानले.

इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

विशेष म्हणजे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 225 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ 225 धावाच करू शकला. हरलीन देओलने टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली. तीने 108 चेंडूंचा सामना करत 77 धावा केल्या. हरलीनच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. जेमिमा रॉड्रिग्जने 33 धावांची नाबाद खेळी खेळली. तरी ती भारताला जिंकू शकली नाही. सलामीवीर स्मृती मानधनाने 59 धावा केल्या. स्मृतीने 85 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले. हरमनप्रीतने 14 धावांचे योगदान दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube