इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

Oppenheimer Bhagvadgita : हॉलिवूडचे दिग्दर्शक क्रिस्ट्रोफर नोलन यांचा ‘ओपेनहायमर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यानंतर या चित्रपटावर चाहते आणि नेटिझन्सने भरभरून कमेंट्स केल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. त्यात महत्त्वाचे होते ते म्हणजे चित्रपटाचे भगवद्गीता कनेक्शन. त्यामुळे आता याच भगवद्गीतेवरून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हे प्रकरणं नेमकं काय आहे? पाहूयात… (Controversial Reading Bhagvadgita during Sex Scene in Oppenheimer )

नोलन यांनी या चित्रपटात वास्तविक आणि भगवद्गीतेचा काही संदर्भ वापरला आहे. कारण जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. त्यांनी हिंदू महाकाव्य भगवद्गीतेबद्दल आकर्षण होते. यामध्ये ओपेनहायमर यांची भूमिका सिलियन मर्फि याने साकारली आहे. मात्र एका वादग्रस्त इंटिमेट सीनमध्ये भगवद्गीता वाचताना दाखण्यात आल्याने प्रेक्षकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

त्यामुळे हा सीन सिनेमात जरी असला, तरी त्याला सेन्सॉर बोर्डने परवानगी कशी काय दिली? असं म्हणत प्रेक्षक चित्रपटाच्या निर्मात्यासह सेन्सॉर बोर्डवर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येत आहेत. अगोदर हा सीन अधिकच एक्सपोझीव्ह होता, त्यानंतर तो कमी करण्यात आला. मात्र तरी देखील इंटीमेटसीन दरम्यान अभिनेता सिलियन मर्फि अभिनेत्रीला भगवद्गीतेतील श्लोकाचा अर्थ सांगत आहे. त्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

पश्चिमेकडील लोक हिंदू धर्माशी अश्लील संबंध जोडत आहेत. हिंदू धर्मग्रंथाचा अनेदर करत आहेत. हा चित्रपट चांगला आहे. मात्र अशा सीनमुळे त्याने निरासा केली आहे. मात्र या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने परवानगी कशी काय दिली? असं म्हणत प्रेक्षक चित्रपटाच्या निर्मात्यासह सेन्सॉर बोर्डवर प्रचंड टीका करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube