Download App

केरळमध्ये बॉम्बस्फोट! पुणे-मुंबई हायअलर्टवर; सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत 40 हुन अधिक जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील या घटनेनंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ केली आहे. (High alert has been issued in major cities of India after the bomb blasts in Kerala)

दिल्ली, मुंबई, पुणे. बंगळूरु, हैदराबाद, चेन्नई या शहरांमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. येथील ज्यू धार्मिक स्थळांवर उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यात ज्यू धर्माच्या लोकांची मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत. या शहरांमधील सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

केरळमध्ये मोठा हल्ला; ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेत तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट

केरळमध्ये बॉम्बस्फोट :

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. यात हजारो लोक प्रार्थनेसाठी जमले होते. त्याचवेळी सकाळी नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. प्रार्थना सुरु असतानाच एकापाठोपाठ एक सलग तीन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात जखमी झालेल्या 40 हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेला मृतदेह बाहेर काढला आहे. तर ज्या हॉलमध्ये हा स्फोट झाला त्याची क्षमता दोन हजार लोकांची होती. त्यामुळे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पैसे दिल्यानंतर लोक परत करत नाही… : सामुहिक आत्महत्या केलेल्या कुटुंबाची चार ओळींची सुसाईड नोट

दरम्यान, या बॉम्बस्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा पथकाची National Bomb Data Centre ची एक टीमही रवाना करण्यात आली आहे. त्यांनी एनआयएलाही घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. एर्नाकुलममध्ये सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. पोलीस महासंचालक घटनास्थळी जात आहेत. आम्ही हे अतिशय गांभीर्याने घेत आहोत. तपासानंतर अधिक माहिती मिळेल. सध्या एकाचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags

follow us