PM Modi on Hindu Temple Attack : ऑस्ट्रेलियाच पंतप्रधान एंथनी अल्बनीज (Anthony Albanese) हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) व एंथनी अल्बनीज यांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफिच्या चौथ्या सामन्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर आज एक बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या हिंदू मंदिरांवरील हल्ल्या संदर्भात अल्बनीज यांच्याजवळ चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया येथे हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड करण्यात येत आहे. खलिस्तानी चळवळीचे काही जण हे हल्ले करत असल्याची माहिती आहे. यावरुन मोदी यांनी अल्बनीज यांच्याबरोबर चर्चा केली आहे. तसेच या हल्ल्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. अशा पद्धीतीच्या हल्ल्याच्या घटना या आमच्या भारतीयांना चिंता करायला लावणाऱ्या आहेत. तसेच या घटना माझ्या मनाला व्यथित करतात, असेही मोदींनी म्हटले आहे.
या अशा प्रकारच्या घटनांमुळे भारतीयांच्या मनावर किती आघात होतात याबाबत अल्बनीज यांना जाणीव करुन दिल्याचे मोदींनी म्हटले आहे. यानंतर अल्बनीज यांनी देखील त्यांच्यासाठी भारतीयांची सुरक्षा हे प्राधान्य असल्याचे मोदी म्हणाले. याविषयांवर दोन्ही देश सातत्याने संपर्कात राहतील व एकमेकांना आवश्यक ती मदत करतील, असेही मोदींनी सांगितले.
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथील एक प्रमुख हिंदू मंदिर असलेल्या श्री. लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता. गेल्या दोन महिन्यात ऑस्ट्रेलियात मंदिर तोडफोडीची ही चौथी घटना आहे. याआधी 23 जानेवारी रोजी मेलबर्नच्या अल्बर्ट पार्क येथील इस्कॉन मंदिरावर हिंदुस्थान मुर्दाबादच्या घोषणा लिहण्यात आल्या होत्या. त्यानंतर 16 जानेवारी रोजी कैरम डाउन्स विक्टोरिया या भागातील ऐतिहासिक श्री. शिव विष्णु मंदिरात देखील अशी घटना झाली होती.
राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे: विधान परिषदेतून पवारांचे प्रादेशिक संतुलन
दरम्यान याव्यतिरिक्त मोदींनी संरक्षण क्षेत्राविषयी देखील भाष्य केले आहे. संरक्षण क्षेत्रासंबंधी गेल्या काही वर्षात आम्ही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे ते म्हणाले आहे. तसेच यानंतर अल्बनीज यांनी देखील भाष्य केले आहे. मोदी व मी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक निर्णय लवकरात लवकर पूर्ण करु. यावर्षी आम्ही या निर्णयांना पुर्ण स्वरुप देऊ, असे ते म्हणाले आहेत.