Amit Shah : भारतात राजकीय नेत्याचं निवृत्तीचे वय ठरलेले नाही. काही जण लवकर निवृत्ती घेतात, तर काहीजण वयाच्या शेवटपर्यंत राजकारणात सक्रीय राहतात. दरम्यान, आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलंय. आपण निवृत्तीनंतर काय करणार आहोत, याचा प्लॅनच शाह यांनी सांगितलं.
मराठी मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या मिरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची बदली
अहमदाबादमधील ‘सहकार संवाद’ कार्यक्रमात अमित शाह सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शाह यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, मी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर माझे आयुष्य वेद, उपनिषदांच्या अभ्यासासाठी समर्पित करेन. तसेच निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करेल. नैसर्गिक शेती हा एक वैज्ञानिक प्रयोग आहे, नैसर्गिक शेती अनेक अर्थांनी फायदेशीर आहे, असं शाह म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेला गहू खाल्ल्याने कर्करोग होतो, रक्तदाब वाढतो आणि थायरॉईडच्या समस्या निर्माण होतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या पिकवलेले अन्न खाणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनही वाढते. मी माझ्या शेतात नैसर्गिक शेती करतो. आज माझे धान्य उत्पादन जवळपास दीड पट वाढल्याचं शाह म्हणाले.
‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ मध्ये मौनी रॉय करणार कमबॅक? अनेक चर्चांना उधाण
शाह म्हणाले, जेव्हा मी देशाचा गृहमंत्री झालो तेव्हा लोक मला म्हणायचे की तुमच्याकडे एक मोठं आणि महत्त्वाचे खातं आहे. पण ज्या दिवशी मला सहकार मंत्री करण्यात आलं, त्या दिवशी मला वाटलं की, माझ्याकडे गृहमंत्रालयापेक्षाही मोठं खातं आहे. कारण, या खात्याच्या माध्यमातून शेतकरी, गरीबांसाठी काम करता येतं, असं ते म्हणाले.
त्रिभुवन पटेलांनी नावासाठी काहीही केले नाही
अमित शाह म्हणाले, गुजरातसारख्या राज्यात सहकारी संस्था स्थापन करण्याची मूळ कल्पना त्रिभुवन पटेलांची होती. आज सहकारातून इथं एक-एक कोटींची कमाई होतेय. पण, पटेलांनी त्यांच्या आयुष्यात नावासाठी काहीही केले नाही. जेव्हा मी संसदेत त्यांचे नाव घेतलं, तेव्हा त्रिभुवन पटेल कोण आहेत? असा प्रश्न लोकांना पडला होता.. इतके मोठं काम करतांना त्यांनी प्रसिध्दी कधी केली नाही, असं शाह म्हणाले.
ते म्हणाले, संसदेत त्रिभुवन काकांच्या नावाला काँग्रेसने तीव्र विरोध केला होता. मात्र, काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता आम्ही विद्यापीठाला त्रिभुवन काकांचे नाव दिले.
शाह म्हणाले की, त्रिभुवन काकांनी खऱ्या सहकारी संस्थेचा पाया रचला होता. त्यामुळेच आज गुजरातमधील महिला ८० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. जेव्हा मी जन्मलो तेव्हा बनासकांठामध्ये आठवड्यातून एकदा पाणी येत असे. बनासकांठा आणि कच्छमध्ये पाण्याची खूप समस्या होती. आज येथील एक कुटुंब दुधापासून वर्षाला एक कोटी रुपये कमावते. ही खूप मोठी गोष्ट आहे, असं ते म्हणाले.