मराठी मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या मिरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली

Madhukar Pandey : मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे (Madhukar Pandey) यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या (MNS) मोर्चाला परवानगी न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. निकेत कौशिक (Niket Kaushik) अप्पर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई आता मिरा- भाईंदर – वसई – विरारचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1959 चा 22 याच्या कलम 22 नुसार मिरा- भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती गृह विभागाकडून देण्यात आली आहे.
मराठी मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या मीरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली #MNS #Marathi #MiraBhayandar @Dev_Fadnavis @RajThackeray @mnsadhikrut @PratapSarnaik @ShivsenaUBTComm pic.twitter.com/FLrb01A4zH
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 9, 2025
8 जुलै रोजी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्याला पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी परवानगी नाकारली होती. यानंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. तर माध्यमांसमोर येथ मोर्चाल परवानगी नाकारल्याच्या निर्णयाचे समर्थन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला होता.
संघाचा माणूस असल्याने अध्यक्षपद ? नरेंद्र जाधवांनी मोठा खुलासा करत सगळं सांगितलं
मोर्चाचा मार्ग योग्य नव्हता म्हणून ही परवानगी नाकारली अशी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तर आता राज्य सरकारने मोठी कारवाई करत मिरा- भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली केली आहे. मधुकर पांडे यांच्या जागी आता मिरा- भाईंदर – वसई – विरारची जबाबदारी . निकेत कौशिक अप्पर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे देण्यात आली आहे.
प्रकरण काय?
अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून 8 जुलैला मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांची धरपकड केली. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.