Download App

अर्रर्र! 77 हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक, ‘स्काइप’च्या हजारो अकाउंटवर कारवाई, प्रकरण नेमकं काय?

Home Monistry Blocked 77000 WhatsApp Numbers Digital Arresters : संपूर्ण देशात डिजीटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची मोठी फसवणूक (Cyber Crime) होत आहेत. नागरिकांना गंडा घालण्याचं प्रमाण वाढलंय. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार (Home Monistry) अलर्ट मोडमध्ये आलंय. केंद्रीय गृहमंत्रालयाने यांसदर्भात पावले उचलली आहेत. ‘आयफोरसी’ म्हणजेच इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माध्यमातून काम सुरू आहे.’आयफोरसी’ ने देशभरातली सायबर गुन्हेगारांच्या 77 हजारांहून जास्त क्रमांकाचा शोध लावलाय. त्याचे व्हॉट्सअॅप ब्लॉक (Digital Arresters) केलेत. ‘स्काइप’च्या हजारो खात्यांवर सुद्धा कारवाई केलीय.

मतदार याद्यांत घोळ, पाच महिन्यांत लाखो मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टममधील अधिकारी असल्याचं सांगतात, अन् सामान्य नागरिकांना हे सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्ट करतात. करत सायबर गुन्हेगार नागरिकांना ‘या स्कॅम्समधील व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी सायबर गुन्हेगार प्रामुख्याने व्हॉट्सअॅप (WhatsApp Numbers) कॉलिंग आणि स्काइपचा वापर करत असल्याचं समोर आलंय. ‘आयफोरसी’ने यासंदर्भात कारवाई करताना मागील काही महिन्यांतील तक्रारींचा बघितल्या. तपासादरम्यान सायबर गुन्हेगारांच्या 77 हजार 195 व्हॉट्सअॅप क्रमांक शोधून त्यांना ब्लॉक केलंय. तर 3 हजार 255 स्काइप अकाउंट ब्लॉक केलेत.

सायबर गुन्हेगार ऑनलाइन गंडा घालून विविध बँक खात्यात रक्कम काढतात. यापैकी मोठ्या प्रमाणातील बॅंक खाती गरीब लोकांकडून भाडेतत्वावर घेतलेली असतात, बऱ्याचदा ही खाती नकळतपणे सुद्धा घेतलेली असतात. या बॅंक अकाउंटचे पासबुक, एटीएम कार्ड सर्व सायबर गुन्हेगारांकडे असते. अशाच खात्यांना शोधण्यासाठी सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरची स्थापना करम्यात आलीय.

मला पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मारहाण केली, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

यात मोठ्या बँका, वित्तीय संस्था, पेमेंट अग्रिगेटर्स, टेलिकॉम कंपन्या, आयटी तज्ज्ञ आणि विविध राज्यांच्या एजन्सीजचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. आतापर्यंत ‘सीएफएमसी’ने 9.23 लाख ‘म्युच्युअल अकाउंट्स’चा शोध लावलाय. देशभरात तब्बल सात लाखांहून जास्त सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 2/08 लाख आयएमईआय क्रमांकांचा शोध लावून ब्लॉक केलेत.
सायबर गुन्हेगार एकाच वेळी हजारो सिमकार्डचा उपयोग करतात.

डिजिटल अरेस्ट स्कॅमचे हॉटस्पॉट्स मेवात, जामतारा, अहमदाबाद, हैदराबाद, चंडीगड, विशाखापट्टणम, गुवाहाटी आहेत. आता या हॉटस्पॉट्ससाठी तब्बल सात ‘जॉइंट सायबर कोऑर्डिनेशन टीम्स’ स्थापन करण्यात आल्यात.

 

follow us