लंडन रिटर्न, P.hD अन् UPSC पास रॅन्चोचा पराक्रम; पुण्यात केलं अडीच कोटींचं कांड
Pune Cyber Police फसवणुकीत आतापर्यंत तुम्ही अशिक्षित किंवा गुन्हेगारीकडे वळलेल्यांचे प्रकार वाचले किंवा ऐकले असतील. पण,

Pune Cyber Police Open Big Fraud Case Accused Arrested From Hyderabad : फसवणुकीत आतापर्यंत तुम्ही अशिक्षित किंवा गुन्हेगारीकडे वळलेल्यांचे प्रकार वाचले किंवा ऐकले असतील. पण, पुणे सायबर पोलिसांनी अशा एका भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत ज्याचं शिक्षण ऐकून प्रत्येकाच्या भुवया उंचावतील. पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केलेला भामटा साधासुधा नसून, लंडन रिटर्न आहे. एवढेच काय तर या महाशयांनी पीएचडी आणि युपीएसीची परिक्षादेखील पास केलेली असून, एका नामांकित महाविद्यालयाला थोडा थोडका नव्हे तर, तब्बल अडीच कोटींनी फसवल्याप्रकरणी या उच्चशिक्षित रॅन्चोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर तेलंगणातील विविध ठाण्यांत यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
शत्रूंचं टेन्शन वाढणार! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी
नेमकं प्रकरण काय?
तब्बल 2 कोटी 46 लाख रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याचे नाव नाव सितैया किलारु (वय 34, रा. याप्रल, हैद्राबाद) असे आहे. पोलिसांनी त्याला हैद्राबादमधून उचललं आहे. किलारू याने IIT मुंबईच्या प्राध्यापकाचे नाव वापरून पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाला AI व ड्रोन प्रकल्प मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शासनाने मंजूर केलेल्या एआय आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पच्या फंडिंग प्रकल्पासाठी 2 टक्के रक्कम भरावी लागल्याचे सांगत विद्यापीठाचा विश्वास जिंकला अन् विद्यापीठालाच मोठा गंडा घातला. किलारुला बेटींगचा नाद होता. त्यामुळे त्याला कुटुंबानेही सोडून दिलेलं आहे. किलारूकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या दोन खात्यातील 29 लाख गोठविले आहेत. तसेच त्याच्याकडून 10 डेबिट कार्ड, 12 पासबुक, सोने खरेदीच्या पावत्या, चार मोबाईल, टॅब, लॅपटॉप, दागिने, दोन कार असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचं वापरलं नाव
संबंधित विद्यापीठाला गंडवण्यासाठी या उच्चशिक्षित भामट्याने चक्क सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरुच्या नावाने मेसेज केला. यात आयआयटी मुंबईतील प्राध्यापक डॉ. चेतन कामत यांचा नंबर देण्यात आला होता. यानंतर किलारूच्या बोलण्यावर विश्वास ठेवत विद्यापीठाने शासनाने मंजूर केलेल्या एआय व ड्रोन रिसर्च प्रकल्पचे फंडिंग प्रोजेक्टसाठी 2 टक्के रक्कम म्हणजे 2 कोटी 46 लाख रुपये भरले. पण करार करताना किलारूने पळ काढला. तेव्हा हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे विद्यापीठाच्या समोर आला. Pune Cyber Police Open Big Fraud Case Accused Arrested From Hyderabad
हवेत उडणाऱ्यांनो थोडं जमिनीवर लक्ष द्या; वसंत मोरेंचा मुरलीधर मोहोळ यांना टोला…
सितैया किलारु कोण आहे?
-आरोपी मूळचा विजयवाडा येथील 2010 मध्ये ई. एन. टी. सी. इंजिनिअर
-2010 ते 2014 स्टँडफोर्ड युनिव्हसिटी लंडन, यू. के. येथे मास्टर डिग्री,
ब्रिमिंगहम युनिव्हर्सिटी लंडन येथून पीएच. डी.
-2015-16 हैदराबाद येथील कोनेरू विद्यापीठात नोकरी
-2016 ते 18 बीआरआयटी विद्यापीठात नोकरी
-2019 व 2020 यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा पास