नवी दिल्ली : आज संसदेच्या अभिभाषणात काँग्रेस नेते राहुल गांधींनी उद्योजक गौतम अदानी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात असलेल्य सूताचा (Relationship between Gautam Adani and Narendra Modi) खुलासा केलाय. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना काही घटनांमुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्यावेळी मोदींच्यामागे ठामपणे फक्त गौतमी अदानीच उभे राहिल्याचा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला आहे.
From Tamil Nadu, Kerala to Himachal Pradesh we have been listening one name everywhere 'Adani'. Across the entire country, it's just 'Adani', 'Adani', 'Adani'…people used to ask me that Adani enters any business and never fails: Congress MP Rahul Gandhi in LS pic.twitter.com/5LV5nRNM8V
— ANI (@ANI) February 7, 2023
राहुल गांधी म्हणाले, मी भारत जोडो यात्रेवेळी देशभरातील अनेक राज्यांत फिरलो. त्यावेळी माझ्याकडे लोकांनी सवाल केला की, अदानी कसकाय अनेक क्षेत्रांमध्ये अचानक पुढे जात आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचे फक्त एक-दोन बिझनेस होते, पण आता त्यांचे आठ-दहा बिझनेस आहेत, हे असं कसं शक्य झालं? असा सवाल मला अनेकांनी केल्याचं गांधी यांनी संसदेत म्हंटलंय.
या प्रकरणावर भाष्य करताना गांधी पुढे म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि खरी जादू सुरू झाली. काही वर्षातच अदानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी सरकारने विमानतळाच्या विकासाची योजना आखली.
जेव्हा ही योजना आखण्यात आली होती तेव्हा, एक नियम होता ज्यांना अनुभव नाही, त्यांना विमानतळ देता येत नव्हते. पण, हा नियम भाजप सरकारने बदलला आणि विमानतळांचे खासगीकरण करुन अदानींच्या हातात सहा विमानतळ दिले. यानंतर अदानींनी देशातील सर्वाधिक एअर ट्रॅफिक स्वतःच्या विमानतळांवर वळवल्याचंही त्यांनी म्हंटलंय.
तसेच नरेंद्र मोदी यांनी अदानींना बांग्लादेशातले मोठे पॉवर प्रोजेक्ट मिळवून दिले आहेत. त्यानंतर मोदी श्रीलंकेला गेले आणि तेथील सरकारवर दबाव टाकून एक मोठा विंड प्रोजेक्ट अदानींना मिळवून दिला. सरकारी कंपनी असलेल्या LIC चा पैसाही अदानींच्या कंपनीत लावून मोठी मदत केल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केलाय.
दरम्यान, अदानी देशाच्या अर्थ क्षेत्रात हस्तक्षेप करतात, डिफेन्स क्षेत्रात हस्तक्षेप करतात. शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे भारतात आणले जात आहेत. या कंपन्या कोणाच्या आहेत, हे तपासण्याचे काम सरकारचे असल्याचंही त्यांनी म्हंटलय.