How much impact did Sayoni Ghosh’s statement? : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला वेग आला तसतसं राज्याच्या राजकारणात मोठा बदल दिसून येत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असून, पक्षाचे नेते याला ऐतिहासिक विजयाची चाहूल मानत आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी हा निकाल हिंदू मतदारांच्या एकजुटीचा विजय असल्याचा दावा केला आहे. त्यांनी हा निकाल तृणमूल काँग्रेसच्या कथित मुस्लिम तृष्टीकरण राजकारणाविरोधातील जंताचा प्रतिसाद असल्याचे सांगितले. अधिकारी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, राज्यातील हिंदू मतदारांनी ममता बॅनर्जी यांना कडक संदेश दिला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत सायोमी घोष पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. प्रचारादरम्यान जादवपूरमधील एका सभेत त्यांनी मेरे दिल काबा और आंखों में मदीना हे गाणं गायलं होतं. या गाण्यावरून भाजपने तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका करत धार्मिक पक्षपाताचा आरोप केला. या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील पश्चिम बंगालमधील सभेत प्रतिक्रिया दिली होती. आम्ही काबा बानू देणार नाही असे म्हणत त्यांनी या मुद्द्यावरून टीएमसीवर निशाणा साधला होता.
मोदींच्या दहा रुपयांच्या झालमुरीमुळे जिल्ह्याचा निकाल फिरला ! झाडग्राममधील चारही जागा भाजपकडे
आता समोर येणाऱ्या कलांनुसार, भाजपने मतदारांचे ध्रुवीकरण करणतात यश मिळवल्याचा दावा केला जात आहे. पक्षाच्या मते, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात तृणमूल काँग्रेसच्या बाजूने एकवटले, तर हिंदू मतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला पाठिंबा दिला. भाजपचा दावा आहे की, मुस्लिमबहुल भागांमध्ये काँग्रेसला 80 ते 90 टक्के मते मिळाली, तर हिंदुबहुल भागांमध्ये भाजपला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यावेळी 100 जागांचा आकडा देखील पार करू शकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजप नेत्यांच्या मते, हा निकाल राज्यातील सत्ताधारी राजकारणाविरोधातील जनतेचा स्पष्ट कौल आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसकडून या आरोपांवर अद्याप सविस्तर प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या निकालांचा पश्चिम बंगालच्या भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे.
