EPFO Rules : लग्नासाठी PF मधून किती पैसे काढू शकतात? जाणून घ्या ‘हे’ नियम

EPFO Rules : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ सर्वात फायदेशीर पर्याय आहे. कर्मचाऱ्यांना

EPFO Rules

EPFO Rules

EPFO Rules : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ सर्वात फायदेशीर पर्याय आहे. कर्मचाऱ्यांना अडचणीच्या वेळी ईपीएफओमधून पैसे काढण्याचा पर्याय देण्यात आल्याने हा पर्याय खाजगी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर ठरतो. तर दुसरीकडे ईपीएफओने कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी काही नियम लागू केले आहे.

या नियमांनुसार तुम्ही लग्नासाठी देखील ईपीएफओमधून (EPFO Rules) पैसे काढू शकतात. लग्नासाठी तुम्ही ईपीएफओमधून किती आणि किती वेळा पैसे काढू शकतात हे जाणून घ्या.

ईपीएफओने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार आता लग्नासाठी पैसे काढणे खूप सोपे झाले आहे. या नवीन नियमांनुसार, ईपीएफओ सदस्य स्वत:च्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नासाठी त्यांचे संपूर्ण ईपीएफओ शिल्लक रक्कम आणि नियोक्ता हिस्सा किंवा 100 टक्के रक्कमपर्यंत काढू शकतात. यापूर्वी लग्नासाठी पैसे काढण्याची मर्यादा फक्त तीन वेळा होती मात्र आता पाच वेळा तुम्हाला लग्नासाठी ईपीएफओमधून पैसे काढता येणार आहे.

तसेच पूर्वी लग्नासाठी ईपीएफओमधून पैसे काढण्यासाठी किमान सात वर्षांच्या सेवेची आवश्यकता होती मात्र आता ती सहा वर्ष करण्यात आली आहे. तसेच पैसे काढण्यासाठी विवाह प्रमाणपत्र किंवा इतर कोणतेही विशिष्ट कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही.

स्वागताला मनाची आणि घराची दारं उघडी ठेवा…, 11 जानेवारीपासून रितेश भाऊ घेऊन येत आहे महाराष्ट्राचं तुफान!

पैसे काढण्याचे नवीन नियम

ईपीएफओने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांपैकी, एक म्हणजे तुम्ही आता तुमचा संपूर्ण पीएफ निधी काढू शकता. कमाल पैसे काढण्याची मर्यादा पूर्वीच्या तीनवरून पाच करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे बदल म्हणजे सेवेची वर्षे. पूर्वी, वेगवेगळ्या पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या वर्षांची सेवा निर्दिष्ट केली जात होती, परंतु आता ती मर्यादा 12 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. शिवाय, लग्न काढण्यासाठी, लग्नाचे प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक नाही.

Exit mobile version