नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman)यांनी आज बुधवारी (दि.1) 2023-24 वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यामध्ये 5.94 लाख कोटींचा संरक्षण (Defence) क्षेत्राचा अर्थसंकल्प जाहीर केलाय.
गेल्या वर्षीच्या संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही तरतूद जवळपास 13 टक्क्यांनी अधिक आहे. यावेळी संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पात सरकारनं नवीन शस्त्रास्त्रांची खरेदी, सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, संरक्षण क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भर भारत यावर मोठा भर दिलाय.
कोणात्या विभागाला किती निधी (निधी लाख कोटींमध्ये)
संरक्षण मंत्रालय – 5.94
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय – 2.70
रेल्वे मंत्रालय – 2.41
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय – 2.06
गृह मंत्रालय – 1.96
रसायने व खते मंत्रालय – 1.78
ग्रामीण विकास मंत्रालय – 1.60
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय – 1.25
दूरसंचार मंत्रालय – 1.23