Raghav Chadha Video : आम आदमी पार्टीच्या अंतर्गत गोटात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी केल्यानंतर खासदार राघव चड्ढा यांनी प्रथमच आपली सडेतोड भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करत त्यांनी, “माझा आवाज दाबला गेला असेल, पण मी पराभूत झालेलो नाही.” अशा शब्दांत आपल्याच पक्षाला थेट इशारा दिला आहे.
Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं
जनतेचा आवाज उठवणं गुन्हा आहे का?”
राघव चड्ढा यांनी या व्हिडिओमध्ये अत्यंत भावूक पण तितक्याच आक्रमकपणे आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, संसदेत मी नेहमीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या विषयांवर भाष्य केलं. मी विमानतळावरील महागड्या जेवणाचा मुद्दा उपस्थित केला. मी ब्लिंकइट-झोमॅटो रायडर्सचा मुद्दा उपस्थित केला. मी टोल प्लाझांच्या माध्यमातून बँक शुल्काची लूट होण्याचा मुद्दा उपस्थित केला. सर्वसामान्यांशी संबंधित प्रश्न मांडल्याने जनतेचा फायदाच झाला, मग पक्षाचं काय नुकसान झालं? माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न का होतोय?” असा बोचरा सवाल चड्ढा यांनी उपस्थित केला.
अरविंद केजरीवाल आजचे गांधी! भाजप त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही, राघव चढ्ढा यांचा हल्लाबोल
मी तुमच्यासाठीच…
जनतेला संबोधित करताना राघव चड्ढा म्हणाले की, “तुम्ही लोक मला अमर्याद प्रेम देता. जेव्हा जेव्हा मी तुमचे प्रश्न मांडतो, तेव्हा तुम्ही मला पाठिंबा देता, माझी प्रशंसा करता आणि मला प्रोत्साहन देता. मला तुमचे आभार मानायचे आहेत. माझा हात असाच धरून ठेवा आणि मला पाठिंबा देत राहा. मी तुमचा आहे आणि तुमच्यासाठीच आहे. ज्यांनी आज संसदेत बोलण्याचा माझा हक्क हिरावून घेतला आणि माझा आवाज दाबला, पण, “मेरी खामोशी को मेरी हार मत समझना, मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है!” ही व्हिडिओच्या शेवटी राघव चड्ढा यांनी वापरलेली शायरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Silenced, not defeated
My message to the ‘aam aadmi’
—
खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ'आम आदमी’ को मेरे संदेश pic.twitter.com/poUwxsu0S3
— Raghav Chadha (@raghav_chadha) April 3, 2026
