Download App

मी अभिनेत्री होणारचं अन् … महाकुंभातील व्हायरल मोनालिसाने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याची (Maha Kumbh 2025) सुरुवात झाली असून महाकुंभ मेळाव्यातून

  • Written By: Last Updated:

Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याची (Maha Kumbh 2025) सुरुवात झाली असून महाकुंभ मेळ्यातूनआतापर्यंत अनेकजण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे त्यापैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरहून महाकुंभात हार विकण्यासाठी आलेली मोनालिसाला (Monalisa). महाकुंभातील ऐश्वर्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाला आता अभिनेत्री व्हायचे आहे. तसेच तिला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता सलमान खानला (Salman Khan) भेटायचं आहे.

काही दिवसापूर्वी महाकुंभ सोडून गेलेली मोनालिसा आता पुन्हा महाकुंभात परतली आहे. यावेळी ती तिच्यासोबत स्वतःचे यूट्यूब चॅनेल घेऊन आली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने मनातील भावना व्यक्त करत मला अभिनेत्री व्हायचे आहे आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सलमान खानला भेटायची इच्छा व्यक्त केली.

या मुलाखतीमध्ये बोलताना तिने तिच्या मनातील भावना व्यक्त करत तिला सोनाक्षी सिन्हा आवडते आणि आयुष्यात एकदा तरी तिला भेटायचे आहे. तसेच तिला सलमान खानलाही भेटायचे आहे. असं तिने सांगितले. तसेच तिला बॉलिवूडमध्येही अभिनय करायचा आहे आणि संधी मिळाली तर तिला चित्रपटांमध्येही गाण्याची इच्छा आहे. असं देखील या मुलाखतीमध्ये मोनालिसा म्हणाली.

अनेक रील्स आणि व्हिडिओ व्हायरल

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात इंदूरहून रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी मोनालिसा भोसले आली होती पण तिच्या मधुर डोळ्यांनी तिला रातोरात स्टार बनवले. मोनालिसाचे अनेक रिल्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे महाकुंभात ती जिथे जिथे हार विकायला जायची तिथे तिथे लोक तिच्यासोबत सेल्फी काढत होते मात्र यामुळे तिच्या कामावर परिणाम होत असल्याने तिच्या पालकांनी तिला इंदूरला परत पाठवले होते मात्र आता ती पुन्हा एकदा महाकुंभात परतली आहे.

भाजपला पैशांची गरज म्हणून त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद हवं, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल 

यावेळी ती स्वतःचे यूट्यूब चॅनेल घेऊन आली आहे आणि या चॅनेलसाठी व्हिडिओ आणि रील्स बनवत आहे. ब्युटी पार्लर टीमने मेकअप केल्यानंतर ती खूप आनंदी आहे. तिच्या ओठांवर गडद लिपस्टिक आणि डोळ्यांवर गडद रंग असल्याने तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

follow us