Download App

83 विमानांपैकी एकही विमान पोहोचलेले नाही, संरक्षण करारावर आयएएफ चीफ मार्शल भडकले

IAF Chief Marshal Amar Preet Singh : देशाची राजधानी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर

IAF Chief Marshal Amar Preet Singh : देशाची राजधानी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग (IAF Chief Marshal Amar Preet Singh) यांनी मोठ्या संरक्षण खरेदी प्रकल्पांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त करत संरक्षण खरेदीमध्ये जबाबदारी आणि तत्परतेची मागणी केली आहे. ते सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषदे (CII Annual Business Summit) बोलत होते. करारावर स्वाक्षरी करताना असे अनेक वेळा घडले आहे की आपल्याला माहित आहे की या सिस्टीम कधीही येणार नाहीत.असं या कार्यक्रमात बोलताना एअर मार्शल अमर प्रीत सिंग म्हणाले. या शिखर परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) देखील उपस्थित होते.

करारामध्ये वेळेची मर्यादा ही एक मोठी समस्या आहे. एकही करारावेळेवर पूर्ण झालेला नाही. जेव्हा कोणताही प्रकल्प वेळेवर पूर्ण होत नाही, तेव्हा प्रत्येक वेळी आश्वासने का दिली जातात? असं एअर मार्शल म्हणाले.

‘ऑर्डर केलेल्या 83 विमानांपैकी एकही विमान पोहोचलेले नाही’

या कार्यक्रमात बोलताना एअर मार्शल यांनी लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) कार्यक्रमाचा संदर्भ देत सांगितले की, तेजस एमके-1ए लढाऊ विमानाची डिलिव्हरी अडकली आहे, जी फेब्रुवारी 2021 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत झालेल्या 48,000 कोटी रुपयांच्या करारांतर्गत आहे. ऑर्डर केलेल्या 83 विमानांपैकी एकही विमान आतापर्यंत पोहोचलेले नाही, तर मार्च 2024 मध्ये डिलिव्हरी सुरू होणार होती. असं ते म्हणाले.

तर विलंबामुळे तेजस एमके1ए लढाऊ विमानासह अनेक प्रमुख प्रकल्पांवर परिणाम झाला आहे. एअर चीफ मार्शल सिंग म्हणाले की तेजस एमके2 चा प्रोटोटाइप अद्याप सुरू झालेला नाही. अद्याप स्टिल्थ एएमसीए लढाऊ विमानाचा कोणताही प्रोटोटाइप नाही.

वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोल माफी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

‘लष्करांना सक्षम करून युद्धे जिंकली जातात’

आपल्याला आतापासून भविष्यासाठी तयारी करावी लागेल. 10 वर्षांत आपल्याला उद्योगाकडून अधिक उत्पादन मिळेल, परंतु आज आपल्याला ज्याची आवश्यकता आहे, ती आपल्याला आज आवश्यक आहे. आपल्याला शक्य तितक्या लवकर आपले काम एकत्रित करण्याची आवश्यकता आहे. सैन्यांना सक्षम करून युद्धे जिंकली जातात. असेही एअर मार्शल म्हणाले.

follow us