“…जर त्यांना काही झाले तर मी कोणालाही सोडणार नाही” लालूंच्या CBI चौकशीवरून मुलगी संतापली

नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली […]

lalu yadav daughter rohini acharya

lalu yadav daughter rohini acharya

नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली होती. सीबीआयनं राबडी देवी यांची तब्बल 4 तास चौकशी (Inquiry)केल्याचं समजतंय.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी सीबीआयनं बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना समन्स बजावलं होतं आणि त्यांनी स्वत:हून सोमवारी (दि. 6 मार्च) त्यांच्या निवासस्थानी चौकशीची तारीख निश्चित केली होती. या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहित यांनी एक ट्विट करत थेट इशारा दिला आहे. जर त्यांना काही झालं तर मी कोणालाही सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

काय म्हटले आहे ट्विट मध्ये?

रोहिणी आचार्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पापाला सतत त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झाले तर मी कोणालाही सोडणार नाही. वडिलांना त्रास देणे योग्य नाही. हे सर्व लक्षात ठेवले जाईल. काळ गंभीर असतो, त्यात मोठी शक्ती आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

हे लोक वडिलांना त्रास देत आहेत, जर त्यांच्या छळामुळे त्यांना समस्या निर्माण झाली तरतर ते दिल्लीची खुर्ची हादरवून टाकू. आता सहन करण्याची मर्यादा संपली आहे.”

नेमकं प्रकरण काय आहे?

लालू यादव 2004-2009 दरम्यान रेल्वेमंत्री असताना लालू कुटुंबाला रेल्वेत ग्रुप डीच्या नोकऱ्यांच्या बदल्यात भेट म्हणून किंवा अत्यंत कमी किंमतीत जमीन घेतल्याचे आरोप आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यातील आरोपींमध्ये लालूंसोबतच कुटुंबातील अनेकांची नावं आहेत. आरोपानुसार, लालू यादव रेल्वेत तात्पुरती नियुक्ती करत असत. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तो नियमित केलं जायचं.

रेल्वे नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं ऑक्टोबरमध्ये आरोपींविरुद्ध दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयानं लालू यादव, राबडी देवी, मुलगी मिसा भारती आणि इतर आरोपींना 15 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version