राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणी (Land For Job)सीबीआय (CBI)माजी रेल्वेमंत्री आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची आज (दि.7) चौकशी करणार आहे. लालू सध्या दिल्लीमध्ये (Delhi)आहेत. त्यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण (Kidney transplant)करण्यात आलेय. याआधी सोमवारी सीबीआय बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi)यांच्या घरी पोहोचली होती. सीबीआयनं राबडी देवी यांची तब्बल 4 तास चौकशी (Inquiry)केल्याचं समजतंय.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी सीबीआयनं बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना समन्स बजावलं होतं आणि त्यांनी स्वत:हून सोमवारी (दि. 6 मार्च) त्यांच्या निवासस्थानी चौकशीची तारीख निश्चित केली होती.

राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; धुळ्यात गारपिटीनं पिकांचं नुकसान

राबडी देवी या बिहार विधान परिषदेच्या सदस्याही आहेत. सोमवारी तब्बल 4 तासांनंतर त्या विधानपरिषदेत जात असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्या संतप्त झाल्या. राबडीदेवींना विचारलं की, सीबीआय तुमच्या घरी आलीय. त्यावर त्या म्हणाल्या की, मग काय करायचं. सीबीआय आमच्याकडं येत असते.

सीबीआयच्या आगमनावर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, महाआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू राहील, असं मी सांगितलं होतं. भाजपसोबत राहिलात तर राजा हरिश्चंद्र व्हाल. पण आमची हरकत नाही. बिहारची जनता सर्व काही पाहतेय, असंही ते यावेळी म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?
लालू यादव 2004-2009 दरम्यान रेल्वेमंत्री असताना लालू कुटुंबाला रेल्वेत ग्रुप डीच्या नोकऱ्यांच्या बदल्यात भेट म्हणून किंवा अत्यंत कमी किंमतीत जमीन घेतल्याचे आरोप आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यातील आरोपींमध्ये लालूंसोबतच कुटुंबातील अनेकांची नावं आहेत. आरोपानुसार, लालू यादव रेल्वेत तात्पुरती नियुक्ती करत असत. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तो नियमित केलं जायचं.

रेल्वे नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं ऑक्टोबरमध्ये आरोपींविरुद्ध दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयानं लालू यादव, राबडी देवी, मुलगी मिसा भारती आणि इतर आरोपींना 15 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube