Download App

IIT बाबाकडे सापडला गांजा, जयपूर पोलिसांनी केली अटक, तात्काळ जामीनही मंजूर..

आयआयटी बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तात्काळ त्यांना जामीनही मंजूर झालाय.

  • Written By: Last Updated:

Case against IIT Baba: महाकुंभमेळ्या दरम्यान प्रसिद्ध झोतात आलेले आयआयटी बाबा (IIT Baba) अभय सिंह हे पुन्हा कदा चर्चेत आलेत. आयआयटी बाबांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जयपूर पोलिसांनी (Jaipur Police) त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केली. गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर तात्काळ त्यांना जामीनही मंजूर झालाय.

काय सांगता? बिहारचं बजेट जगातील 150 देशांच्या GDP पेक्षा जास्त, सविस्तरच वाचा 

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी बाबांनी सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यामुळे जयपूर पोलिसांनी पार्क क्लासिक हॉटेलमधून ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडे गांजा देखील आढळून आला. त्यामुळं पोलिसांनी बाबाला अटकही केली होती. एनडीपीएस कायद्यांतर्गत (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट) त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. .त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला गांजाचा साठा परवानगीच्या मर्यादेत असल्याने त्यांना काही वेळासाठी ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले, असं पोलिसांनी सांगितलं.

शिवरायांचा अपमान करा अन् सुरक्षा मिळवा हा भाजपचा कार्यक्रम, या किडे प्रवृ्त्तीचा धिक्कार, कॉंग्रेसचा हल्लाबोल 

पोलिसांनी सोडल्यानंतर आयआटी बाबांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, आपल्याकडे आढळलेला गांजा हा प्रसाद असल्याचं म्हटलं. तसेच आपल्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्याची पुष्टीही त्यांनी केली.

आयआयटी बाबांचे म्हणणे काय?
हॉटेलात मी राहत होतो, तिथं पोलीस पोहोचले आणि मी गोंधळ घालत असल्याचं सांगून त्यांनी मला ताब्यात घेतलं. मला वाटंत की, हे एक विचित्र कारण होतं. कुंभमधील जवळपास प्रत्येक बाबा प्रसाद म्हणून गांजा घेतात, ते या सर्वांना अटक करणार का, असा सवालही आयआयटी बाबांनी केला. मी अघोरी बाबा आहे, परंपरेनुसार, आम्ही गांजाचे सेवन करू शकतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आयआयटी बाबा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई येथून पदवीधर आहेत. त्यामुळंच त्यांना महाकुंभमेळ्यात आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. याच आयआयटी बाबांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि भारत सामन्यापूर्वी मोठी भविष्यवाणी केली होती. हा सामना पाकिस्तानच जिंकणार असं त्यांनी म्हटलं. मात्र, त्यांचं भाकीत खोटं ठरलं.

 

follow us

संबंधित बातम्या