IIT Baba: दहावीला ९३, बारावीत ९२.४ टक्के मार्क्स, जेईईचा रिझल्ट पाहाल तर थक्क व्हाल; आयआयटी बाबांची मार्कशीट व्हायरल

IIT Baba: दहावीला ९३, बारावीत ९२.४ टक्के मार्क्स, जेईईचा रिझल्ट पाहाल तर थक्क व्हाल; आयआयटी बाबांची मार्कशीट व्हायरल

IIT Baba Abhay Singh Viral Marksheet: महाकुंभमेळ्या दरम्यान प्रसिद्ध झोतात आलेले आयआयटी बाबा (IIT Baba) हे सतत चर्चेच असतांना. त्यांचं खरे नाव अभय सिंह (Abhay Singh ) असले तरी जग आता त्यांना आयआयटीयन बाबा म्हणून ओळखते. अभय सिंह यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) शिक्षण घेतल्यानं त्यांना आयआयटीयन बाबा असं नाव देण्यात आले. दरम्यान, आता आयआयटीयन बाबांची मार्कशीट व्हायरल झालीये. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मार्कशीटच्या सत्यतेबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत.

Womens Day 2025 : महिलांसाठी राबण्यात येणाऱ्या सरकारच्या खास 6 योजना, कसा घ्याल लाभ? 

दहावी, बारावीला किती गुण?
डीएनए इंडियाच्या अहवालानुसार, व्हायरल होणाऱ्या अभय सिंहच्या १०वी आणि १२वीच्या मार्कशीटमध्ये, त्यांना दहावीत ९३% आणि बारावीत ९२.४% गुण मिळाले होते. यावरून असे दिसून येतं की अभय सिंह हे अभ्यासात खूपच हुशार होते. आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानतंर ते २००८ मध्ये आयआयटी-जेईई परीक्षेत बसले होते. या परीक्षेत अभय सिंह उर्फ ​​आयआयटीयन बाबाला ७३१ वा रँक (एआयआर ७३१) मिळाला. त्यानंतर त्यांना आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळाला. अभय सिंगने २००८-२०१२ च्या बॅचमध्ये आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले.

Maharashtra Weather: नागरिकांनो काळजी घ्या, मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा चाळीशी गाठणार… 

कॅनडामध्ये नोकरी…
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभय सिंहने कॅनडामध्येही नोकरी केली. आपल्या भूतकाळाबद्दल विविध माध्यमांशी बोलताना अभय सिंह यांनी सांगितले की आपण कॅनडामध्ये एका खाजगी कंपनीत तीन वर्षे नोकरी केले. तिथं आपला वार्षिक पगार ३६ लाख रुपये होता… दरम्यान, त्यांनी नोकरी सोडली आणि आत्म-शोधाच्या मार्गावर निघाले. अभय सिंह यांनी डिझाईनमध्ये मास्टर्स (M.Des) पदवी देखील मिळवली. इतकचं नाही तर त्यांनी फोटोग्राफीमध्येही हात आजमावला आहे.

दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई येथून पदवीधर असलेल्या याच आयआयटी बाबांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि भारत सामन्यापूर्वी मोठी भविष्यवाणी केली होती. हा सामना पाकिस्तानच जिंकणार असं त्यांनी म्हटलं. मात्र, त्यांचं भाकीत खोटं ठरलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube