Maharashtra Weather: नागरिकांनो काळजी घ्या, मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा चाळीशी गाठणार…

Maharashtra Weather: नागरिकांनो काळजी घ्या, मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा चाळीशी गाठणार…

Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यात कोरडे आणि शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या तीव्र (Heat Wave) झाल्यात. अशातच आता मुंबईकरांना (Mumbai) होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.

खोक्या भोसलेवर शिकारीचा आरोप, वनविभागाचा पंचनामा; तपासात आढळल्या धक्कादायक गोष्टी 

शुक्रवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या भागात तापमान ४० अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. पुढील पाच दिवसांत राज्यभरातील तापमान वाढणार असून ११ मार्चपर्यंत उष्णतेची लाट उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जिल्ह्यापर्यंत राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.

७ ते ११ मार्च दरम्यान उष्णता वाढणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ७ ते ११ मार्च दरम्यान कोकणपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये प्रंचड उष्णता वाढणार असून या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि धुळ्यास ११ मार्चला हा अलर्ट आहे.

का वाढलंय तापमान?
होळीपूर्वीच तीव्र उष्णतेची लाट नोंदवण्यात आली आहे. वाढते तापमान याचे कारण हिवाळ्यातील पावसाची कमतरता असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय, पुढील काही दिवसांत ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्यानं तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचं हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यातील जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न जाहीर, मुंबई ‘नंबर वन’वर, तर मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे पिछाडीवर… 

कोकणात येलो अलर्ट जारी…
आज राज्यात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता आहे आणि कोकणात उष्ण आणि दमट हवामान असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, उर्वरित महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.

विदर्भ तापलाय…
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, काल (७ मार्च) रत्नागिरी आणि सोलापूरमध्ये सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पारा ३७ अंशांवर नोंदला गेला, तर कोल्हापूरमध्ये ३६.२ अंशांवर नोंद झाली. मराठवाड्यात सध्या रखरख वाढली असून पहाटे गारवा आणि दुपारी प्रचंड उष्णतेच्या झळा अशी स्थिती आहे. विदर्भ चांगलाच तापला असून वाशिममध्ये तापमान ३७.४ अंश आणि अकोल्यात ३६.५ अंशांवर पोहोचले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube