Download App

Adani Group : अदानींच 413 पानाचं उत्तर, त्याला हिंडेनबर्गकडून लगेच प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

अदानी ग्रूपकडून (Adani Group) काल देण्यात आलेल्या ४१३ पानाच्या उत्तराला हिंडेनबर्ग रिसर्चकडून (Hindenburg Research) त्वरित प्रत्युतर देण्यात आलं आहे. अदानींच्या 413 पानांच्या उत्तरात केवळ 30 पाने आमच्या अहवालात उपस्थित केलेल्या मुद्यांवर असल्याचं हिंडेनबर्ग रिसर्चकडून सांगण्यात आलं आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही विचारलेल्या ८८ प्रश्नांपैकी ६२ प्रश्रांना उत्तर देता आली नाहीत.

अदानी ग्रुपने काय दिले होते उत्तर

हिंडेनबर्गचा रिसर्चचा रिपोर्ट हा भारत, भारतातील संस्था, देशाची प्रगती आणि महत्त्वाकांक्षांवर पद्धतशीर केलेला हल्ला आहे, असं म्हणत अदानी ग्रुपकडून हिंडेनबर्गला ऊत्तर दिले आहे. यावेळी हा अहवाल स्वतंत्र, वस्तुनिष्ठ किंवा सखोल संशोधनानंतर तयार केलेला नाही, असंही अदानी ग्रुपकडून म्हणण्यात आलं आहे. आपल्या 413 पानांच्या उत्तरात, अदानी ग्रुपने अहवालात उपस्थित केलेल्या सर्व 88 प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत.

https://letsupp.com/international/hindenburg-research-to-adani-group-shock-understand-the-whole-case-/8671.html

आपल्या उत्तरात अदानी ग्रुपने म्हटले आहे की हा अहवाल खोटा बाजार तयार करण्याच्या हेतूने प्रेरित आहे जेणेकरून अमेरिकन फर्मला आर्थिक लाभ मिळू शकेल. हा केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्ला नाही, तर भारतावर, भारतीय संस्थांचे स्वातंत्र्य, अखंडता आणि गुणवत्ता आणि भारताची प्रगती आणि महत्त्वाकांक्षा यावर पद्धतशीर हल्ला आहे.

Tags

follow us