भाजपची (BJP) सत्ता असलेल्या काही राज्यांनी त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पावली उचलली. आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) देशात समान नागरी कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण, योगगुरू बाबा रामदेव (yoga guru baba ramdev) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारकडे देशात समान नागरी कायदा (यूसीसी) (uniform civil law) आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची (population control law) मागणी केली आहे. सरकारने या दिशेने लवकरात लवकर प्रभावी पावले उचलावीत आणि 2024 पूर्वी हे कायदा लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर उभारले जावे, हे जनतेचे स्वप्न असल्याचे रामदेव म्हणाले. 2024 च्या जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. देशातील कलम-370ही हटवण्यात आले. आता फक्त दोनच कामे उरली आहेत. दरम्यान, UCC आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचे कामही 2024 पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा असल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलं. 9 दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाचं उद्घाटन बाबा रामदेव यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी या मागण्या केल्या.
यावेळी बोलतांना योगगुरू रामदेव म्हणाले की, राम मंदिराबरोबर या देशाचं राष्ट्रीय मंदिर देखील उभारलं पाहिजे. त्याचबरोबर चारित्र्य घडवायला पाहीजे, व्यक्तिमत्व घडवले पाहिजे आणि दैवी नेतृत्व घडवले पाहिजे. ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम सुरू आहे.
हे कार्य सनातन धर्माच्या प्रतिष्ठेचं आणि अभिमानाचं कार्य आहे. जे रामविरोध आहेत, देशद्रोही आहेत, त्यांच्यात राम मंदीर उभारलंज जातंय, या घटनेनं खळबळ उडाली आहे. राम मंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. योगगुरु म्हणाले की, पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, युगाचा धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे.
Priyanka Gandhi Vadra : माझा भाऊ कधी घाबरला नाही, घाबरणारही नाही; राहुल गांधीसाठी प्रियांका मैदानात
संन्यास घेतलेल्या युवक – युवतींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. 9 दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचे अनुष्ठान केले जाईल. सर्व मुले-मुली ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार असल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, ऋषींचे वंशज दीक्षा महोत्सवासाठी तयार केले जात आहेत. हे संन्यासी ऋषींचे प्रतिनिधी आणि उत्तराधिकारी असतील. हे संन्यासी सनातन धर्माचा झेंडा जगात फडकवतील. हे संन्यासी पतंजलीचे उत्तराधिकारी देखील होतील.
रामदेव यांनी सांगितले की, पतंजली ऋषीग्राममध्ये 60 तरुण आणि 40 तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर उत्सवात 500 तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा दिली जाणार आहे. आचार्य बालकृष्ण या 500 तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा देणार आहेत.