Priyanka Gandhi Vadra : माझा भाऊ कधी घाबरला नाही, घाबरणारही नाही; राहुल गांधीसाठी प्रियांका मैदानात
“माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार.” अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. त्यावर प्रियांका गांधी यांनी ट्विट केलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, “घाबरलेली सत्ता सगळ्या यंत्रणा वापरून साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू. सत्याची शक्ती आणि करोडो देशवासीयांचे प्रेम त्यांच्या पाठीशी आहे.”
डरी हुई सत्ता की पूरी मशीनरी साम, दाम, दंड, भेद लगाकर @RahulGandhi जी की आवाज को दबाने की कोशिश कर रही है।
मेरे भाई न कभी डरे हैं, न कभी डरेंगे। सच बोलते हुए जिये हैं, सच बोलते रहेंगे। देश के लोगों की आवाज उठाते रहेंगे।
सच्चाई की ताकत व करोड़ों देशवासियों का प्यार उनके साथ है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 23, 2023
नक्की काय आहे प्रकरण ?
राहुल गांधींनी 2019 मध्ये कर्नाटकातील एका रॅलीमध्ये सर्व चोरांचे नाव मोदीचं (Modi Surname) का असते असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर याप्रकरणाता सुरत येथील सेशन कोर्टात मानहानीची केस दाखल करण्यात आली होती. भाजपचे आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री पूर्णेश मोदींनी ही केस दाखल केली होती. या सर्व प्रकणावर दोषी बाजुंची मते ऐकल्यानंतर कोर्टाने 17 मार्च रोजी यावरील निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी राहुल गांधी तीनवेळी कोर्टात हजर राहिले आहेत.
राहुल गांधींनी कार्नाटकात 13 एप्रिल 2019 रोजी एका निवडणूक रॅलीत म्हटले होते की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव कॉमन का आहे? असे म्हणत सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर भाजप आमदाराने या प्रकरणी मानहीनीचा दावा दाखल केला. तसेच राहुल गांधींनी 2019 च्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना संपूर्म मोदी समुदायाला बदनाम केल्याचा आरोप केला. राहुल गांधीं विरोधात केस दाखल करणारे पूर्णेश भूपेंद्र पटेल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. तसेच ते डिसेंबरमध्ये झालेल्या निडणुकांमध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
दरम्यान, भाजप आमदाराने केलेल्या आरोप राहुल गांधींनी फेटाळून लावले होते. तसेच आपल्यावर लावलेले आरोप चुकीचे असून, रॅलीत आपण काय विधान केले होते ते आठवत नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणात कोर्टाने कार्नाटकातील कोलाचे तत्कालीन निवडणूक अधिकारी आणि भाषणाचे रेकॉर्डिंग करणारे निवडणूक आयोगाच्या व्हिडिओ वरून साक्ष नोंदवली होती. त्यानंतर राहुल यांची चौकशी करण्यात आली होती.
Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, जो माणूस वडिलांना धमकी…