राहुल गांधींची खासदारकी जाणार? कायदा काय सांगतो?

राहुल गांधींची खासदारकी जाणार? कायदा काय सांगतो?

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जुन्या वक्तव्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. राहुल गांधींना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून या प्रकरणी गांधींना न्यायालायने जामीन दिलाय तरी दोन वर्षांच्या शिक्षेमुळे त्यांची खासदारकी जाणार का? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Nitesh Rane : राज ठाकरेंनी सांगितलेलं खरंय, जो माणूस वडिलांना धमकी…

मागील विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये (Karnataka) ‘मोदी हे सर्व चोरांचे आडनाव का आहे?’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजप आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांनंतर आता गुजरातमधील सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. गांधी यांना कोर्टातून लगेच 30 दिवसांचा जामीनही मिळाला.

Sudhir Mungantivar : सांगितलं होतं झाडाला फळ येतील, पण झाडाशीच नातं तोडलं…

सुरतच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्रशासनाने लोकसभा सचिवालयाला पाठवली असून तर लोकसभा अध्यक्षांनी ती स्वीकारताच राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात येणार आहे. आता शिक्षेनंतर राहुल गांधी सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. अशाप्रकारे राहुल गांधी यांना एकूण आठ वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.

कायदा काय सांगतो?
लोकप्रतिनीधींच्या कायद्यानुसार खासदार, आमदारांना 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचे सदस्यत्व रद्द होत असतं. एवढंच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरु शकतात.

दरम्यान, राहुल गांधी यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचे सर्व मार्ग बंद केलेले नाहीत. ते त्यांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, जेथे सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यास सदस्यत्व वाचू शकणार आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागणार आहे. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली तरी त्यांचे सदस्यत्व वाचू शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube