Download App

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, दहशतवादाचा गुन्हा दाखल!

तोषखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय. पाकिस्तान पोलिसांकडून दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये पीटीआय नेत्यांचाही समावेश आहे.

तोषखाना प्रकरणी इम्रान खान यांना पाकिस्तान सुरक्षा रक्षकाचे जवान अटक करणयासाठी गेले असता खान समर्थकांनी हिंसाचार केला होता. अखेर न्यायालयाकडून इम्रान खान यांची अटक तात्पुरती रद्द करण्यात आली होती.

.. म्हणून फडणवीसांनी जाहीर सभेत मागितली माफी; म्हणाले, आधी वेळ दिला होता पण..

त्यानंतर तोषखानाच्या सुनावणीसाठी इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयात नेताच, न्यायालयाच्या आवारात पीटीआय समर्थकांनी संघर्ष केला. यामध्ये 25 पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याचं समोर आलं.

अखेर न्यायालयाबाहेरच इम्रान खान यांनी दिलासा मिळाला होता. न्यायाधीशांना इम्रान खानचे अटक वॉरंट रद्द करावं लागलं. तोषखाना प्रकरणाची सुनावणी आता ३० मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आलीय.

अंबाबाई मूर्तीची झीज! पालकमंत्री दीपक केसरकरांनी बोलावली बैठक

न्यायालयाच्या आवारात संघर्ष केल्याप्रकरणी पीटीआयच्या 17 नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या कार्यकर्त्यांनी पोलिस चौकी आणि न्यायालय संकुलाच्या मुख्य गेटची तोडफोड केली. यादरम्यान जाळपोळ आणि दगडफेकीची घटनाही घडली. या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनूसार दोन पोलिस वाहने आणि सात मोटारसायकली जाळण्यात आल्या असून एसएचओच्या अधिकृत वाहनांचेही नुकसान झाले. इम्रान खान यांना लाहोरहुन इस्लामाबाद न्यायालयात नेले असता त्याचवेळी खान समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घरात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून करण्यात आला आहे.

Tags

follow us