.. म्हणून फडणवीसांनी जाहीर सभेत मागितली माफी; म्हणाले, आधी वेळ दिला होता पण..

.. म्हणून फडणवीसांनी जाहीर सभेत मागितली माफी; म्हणाले, आधी वेळ दिला होता पण..

Devendra Fadnavis : साकळाई उपसासिंचन योजना मंजूर करून त्यासाठी निधी दिल्याबद्दल आज नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सत्कार समारंभ व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी ऑनलाइन पद्धतीने या मेळाव्यास हजेरी लावली.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा शब्द दिल्यानंतर प्रत्यक्षात येता आले नाही म्हणून त्यांनी माफीही मागितली. मेळाव्यातील भाषणाच्या शेवटी त्यांनी माफी मागितली आणि माफी मागण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, की खरे तर या कार्यक्रमाला येण्याचे मी सांगितले होता. त्यासाठी वेळही दिला होता. पण, त्यावेळी माझ्या हे लक्षात नव्हते की नागपूर येथे जी 20 बैठकीच्या उद्घाटनासाठाही जायचे आहे. हे लक्षात आल्यानंतर मला या कार्यक्रमास दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित राहू द्या, अशी विनंती केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचा : कर्डिले चमत्कारिक, त्यांच्या टोपीखाली काय-काय दडलंय ? ; फडणवीसांनाही पडला प्रश्न 

साकळाई उपसासिंचन व पुनर्भरण योजनेस मंजुरी व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन रुईछत्तीसी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले, विक्रम पाचपुते आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की साकळाई योजनेसाठी मंत्री विखे पाटील, शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. या योजनेमुळे 32 गावांना फायदा होणार आहे. या योजनेंतर्गत सहा लघुपाटबंधारे तलाव 16 पाझरतलाव आणि 96 बंधाऱ्यांचे पुनर्भरण होणार असून जवळपास 12 हजार हेक्टरक्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मागे वाळकी येथील सभेत या योजनेला चालना देण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर योजनेसाठी सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. अजित नवले यांना समितीतून वगळलं, नवले यांच्या नावाला फडणवीसांचा विरोध?

सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले, की गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेऐवजी आता अनुदान योजना केली आहे. या योजनेंर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत केली जाणार आहे. मागेल त्याला शेततळे योजनेत सगळ्यात जास्त शेततळे नगर जिल्ह्यात झाली. आता जेवढी मागणी येईल त्यानुसार फक्त शेततळेच नाही अन्य आवश्यक साहित्यही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विषमुक्त शेती करण्यासाठी व दुध उत्पादन वाढविण्यासाठी निर्णय घेतला आहे. शेतरस्ते मोकळे करण्याची योजना आणली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले जाणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून गाव रस्ता व अन्य जिल्हा रस्त्यांना निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारची पाच लाख आधिक राज्य सरकारची पाच लाख अशी एकूण दहा लाख घरे बांधण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

शिंदेंच्या कार्यक्रमाला आले पण इथे..

देवेंद्र फडणवीस मागील आठवड्यात कर्जत येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व शेतकरी मेळाव्यास आवर्जुन उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम त्यांचे जवळचे मित्र आ. राम शिंदे यांनी आयोजित केला होता. त्यामुळे ते या कार्यक्रमाला तसेही येणारच होते. तसे ते आलेही. मात्र आज त्यांनी नगर तालुक्यातील या कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली नाही. त्यामुळे आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube