Imtiaz Jaleel : राज ठाकरेंना मोठे करण्यासाठी भाजपचाच डाव!

नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मुंबईतील माहिम दर्ग्याबाबत व्हिडीओ जाहीर केला. तसेच हा अनधिकृत दर्गा जर हटवला नाही तर आम्ही त्याजवळ गणपती मंदिर बांधू असे जाहीर केले होते. यावरून आता बरेच राजकारण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून भाजपवरच शरसंधान केले आहे. जलील म्हणतात, भाजपकडे राज्याचे […]

ImtiaZ Jaleel

ImtiaZ Jaleel

नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मुंबईतील माहिम दर्ग्याबाबत व्हिडीओ जाहीर केला. तसेच हा अनधिकृत दर्गा जर हटवला नाही तर आम्ही त्याजवळ गणपती मंदिर बांधू असे जाहीर केले होते. यावरून आता बरेच राजकारण तापताना दिसत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून भाजपवरच शरसंधान केले आहे. जलील म्हणतात, भाजपकडे राज्याचे गृहखाते आहे. ते काय करत आहेत. राज ठाकरे यांनी सभेत काय सांगितले आणि दुसऱ्या दिवशी कारवाई केली जाते. त्यामुळे मला वाटते, ही शुद्ध नौटंकी आहे. तुमच्याकडे गृहखाते आहे तर आधीच कारवाई करायला हवी होती. हे केवळ उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करून राज ठाकरे यांना मोठं करायचा प्रयत्न आहे. यामागे भाजपचेच षड्यंत्र आहे, असा आरोप देखील खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.

आदल्या दिवशी राज ठाकरे यांनी माहीमच्या दर्ग्यावरून इशारा द्यावा आणि तात्काळ दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात येते. ही नौटंकी आहे. हे केवळ उद्धव ठाकरे यांच्या समोर राज ठाकरे यांना मोठं करण्याचा डाव भाजपने रचला आहे. सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे या तीन पक्षांची मिलीभगत आहे. तुमच्या हातात गृहखाते असताना ही नौटंकी का करता, असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

भविष्यात काहीही होऊ शकते… Bharat Gogawale मनसेबाबत असे का म्हणाले ?

इम्तियाज जलील म्हणतात की, सरकारमध्ये असताना हिंदू-मुस्लिम असा भेद करता येत नाही. त्यामुळे मनसेच्या राज ठाकरे यांची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांनी मनसेच्या मदतीने विडा उचलला आहे. राज ठाकरे यांचा बाहुल्यासारखा वापर ते करत आहेत.

Exit mobile version