Witchcraft at Hathras School : हातरसमधील एका शाळेत माणुसकीला काळीमा फासणारी घटा घडली आहे. येथील एका शाळेत समृद्धी आणि मोठ्या प्रसिद्धीसाठी काळ्या जादूचा प्रयोग केला आहे. (School) यामध्ये विधीचा भाग म्हणून इयत्ता 2 च्या विद्यार्थ्याचा बळी देण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी वसतिगृहाच्या खोलीत तीन जणांनी मुलाचा गळा आवळून खून केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेचा मालक, त्याचे वडील अशा सगळ्यांचा यामध्ये समावेश होता हे समोर आलं आहे.
इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नरबळी द्यायचा होता. मात्र, त्याच दरम्यान त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. हत्येचे हे प्रकरण तंत्र-मंत्राशी संबंधित आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हातरसचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार म्हणाले, ‘हाथरसच्या साहपाऊ पोलीस स्टेशनने मुलाच्या हत्येचे गूढ उकलले आहे. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मोठी बातमी! पासाविना घुसलेल्या महिलेचा हंगामा; मंत्रालयातील गृहमंत्री फडणवीसांचं कार्यालय फोडलं
विद्यार्थ्याचे वडील कृष्णा कुशवाह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी त्यांना शाळा प्रशासनाने फोन करून मुलगा आजारी पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा कुशवाह शाळेत पोहोचले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, शाळेचे संचालक त्यांच्या मुलाला त्यांच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. नंतर बघेल यांच्या गाडीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
शाळेच्या बाहेरील ट्यूबवेलमध्ये दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, शाळेच्या खोलीतून बाहेर पडताना मुलाला जाग आली. त्यामुळे भीतीपोटी तिन्ही आरोपींनी मुलाचा गळा आवळून खून केला. या शाळेच्या संचालकाचे वडील तंत्र-मंत्राचे काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.
केंद्राच्या 24 समित्या गठीत; राहुल गांधींना ही जबाबदारी, सोनिया गांधींचं काय?
यातील आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, 6 सप्टेंबर रोजी त्यांनी राज नावाच्या 9 वर्षाच्या मुलाचा बळी देण्याची योजना आखली होती, ती फसली. राजचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगा मोठ्याने ओरडला. राजची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यात त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आलं. तपासादरम्यान, शाळेच्या मागे बसवलेल्या नळाच्या विहिरीतून पूजा साहित्य सापडलं, ज्यामुळे तंत्र-मंत्र केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.