दुर्दैवी घटना! पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; दुर्घटनेत 670 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती
Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनीमध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भयंकर असं भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनात अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसंच, मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM)ने रविवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनात 670 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, भूस्खलनामुळे 100 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.
150 पेक्षा अधिक घर जमीनदोस्त
दक्षिण पॅसिफिक बेट राष्ट्रातील यूएन मायग्रेशन एजन्सीच्या मिशनचे प्रमुख सेरहन अक्टोप्राक यांनी सांगितलं की, आणखी किती मृतांची संख्या वाढली याबाबत ठोस असं सांगता येत नाही. कारण या भूस्खलनात 150 हून अधिक घरं जमीनदोस्त झाली आहे. तसंच, सुमारे 60 घरं यामध्ये बुजली असतील असा अंदाज होता. परंतु, ती संख्या वाढली असंही सांगण्यात आलं आहे.
बचावकार्य सुरूच
670 हून अधिक लोक चिखलाखाली दबले आहेत. अक्टोप्राक यांनी शुक्रवारी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितलं की भूस्खलनात 100 लोक मरण पावले असावेत. रविवारपर्यंत म्हणजे आजपर्यंत फक्त पाच मृतदेह आणि आणखी एका व्यक्तीचा पाय सापडला होता. पापुआ न्यू गिनीमध्ये आजही मदतकार्य सुरूच होतं आणि बचावकर्ते वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
China Landslide : चीनमध्ये भीषण दुर्घटना भूस्खलनामुळे 47 हून अधिक लोक ढिगार्याखाली अडकले
20 ते 26 फूट ढिगाऱ्याखाली लोक अडकले
मदत कर्मचाऱ्यांनी सहा ते आठ मीटर (20 ते 26 फूट) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लांकाना वाचवण्यात येश येणार नाही असं सांगितलं आहे. दरम्यान, दक्षिण पॅसिफिक बेटाचे सरकार या घटनेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाची मदत आवश्यक आहे का यावर विचार करत असल्याची माहितीही समोर आली आहे. देशाची राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या एन्गा प्रांतात शुक्रवार 24 जून रोजी ही भूस्खलनाची घटना घडली.