रॉस टेलर पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, 4 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार पण न्युझीलंडकडून खेळणार नाही

  • Written By: Published:
रॉस टेलर पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, 4 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतणार पण न्युझीलंडकडून खेळणार नाही

Ross Taylor Comeback After Retirement : न्युझीलंडचा स्टार फलंदाज रॉस टेलर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. सोशल मीडियावर मोठी घोषणा करत रॉस टेलरने टी-20 विश्वचषकासाठी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असल्याची माहिती दिली आहे. मात्र तो पुन्हा एकदा न्युझीलंडकडून खेळताना दिसणार नाही. रॉस टेलर आता नवीन देशाकडून खेळणार आहे. तो त्याच्या आईच्या मूळ देश सामोआकडून खेळणार आहे आणि त्याचे ध्येय आगामी टी-20 विश्वचषकासाठी संघाला पात्र ठरविणे आहे.

सामोआ (Samoa) हा दक्षिण प्रशांत महासागरात स्थित एक बेट देश आहे. तो न्यूझीलंड आणि हवाई यांच्यामध्ये स्थित आहे. हा देश उपोलू आणि सवाई या दोन मुख्य बेटांनी बनलेला आहे. याशिवाय, त्यात अनेक लहान बेटे देखील आहेत आणि काहींमध्ये लोकवस्तीही नाही.

रॉस टेलरची मोठी घोषणा

रॉस टेलरने (Ross Taylor) सोशल मीडिया पोस्टद्वारे घोषणा केली की, ‘मी अभिमानाने जाहीर करत आहे की मी आता क्रिकेटमध्ये सामोआचे प्रतिनिधित्व करेन. हे फक्त माझ्या प्रिय खेळात परतण्यापुरते मर्यादित नाही. माझ्या वारशाचे, संस्कृतीचे, गावाचे आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणे हा एक मोठा सन्मान आहे. क्रिकेटमध्ये परतण्याची, संघात सामील होण्याची आणि मैदानावर आणि बाहेर माझे अनुभव शेअर करण्याची संधी मिळाल्याने मी खूप रोमांचित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ross Taylor (@rossltaylor3)

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत टेलर खेळणार

रॉस टेलर पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक आशिया-पॅसिफिक पात्रता मालिकेत सामोआचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा ओमानमध्ये (Oman) होणार आहे. ज्यामध्ये यजमान संघाव्यतिरिक्त, सामोआ आणि पापुआ न्यू गिनी टी-20 विश्वचषकासाठी पात्रता मिळविण्याच्या शर्यतीत असतील. पात्रता स्पर्धेत प्रत्येकी तीन संघांचे तीन ग्रुप असतील. प्रत्येक गटातील टॉप 2 संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील अव्वल 3 संघ 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

अनिल अंबानींना धक्का, बँक ऑफ बडोदाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अडचणी वाढणार

रॉस टेलरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

रॉस टेलरने न्यूझीलंडकडून 112 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतकांसह 7683 धावा केल्या आहेत. तर 236 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 8607  धावा केल्या आहेत. टेलरने त्याच्या कारकिर्दीत 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1909 धावा केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube