Download App

मध्य प्रदेशात भाजपला भलमोठं खिंडार, दोन आमदारांसह 10 नेत्यांचा पक्षाला रामराम, कॉंग्रेसमध्ये प्रवेश

  • Written By: Last Updated:

Madhya Pradesh Election : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे (BJP) सरकार आल्यापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या आणि दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली होती. अनेक दिग्गज नेते बाहेर पडल्यानं पक्ष खिळखिळा झाला होता. मात्र, जनाधार कॉंग्रेसच्या (Congress) पाठीशी गेल्याचं दिसतं. त्यामुळंच आता मध्य प्रदेशातही राज्यातील एक विद्यमान आमदार आणि एक माजी आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. दोन आजी-माजी आमदारांसह एकूण 10 भाजप नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून सर्वच पक्षांनी आपापली रणनिती आखण्यास प्रारंभ केला. मध्य प्रदेशामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा सत्तेतून खेचण्यासाठी कॉंग्रेसकडून जोर लावला जात आहे. भाजपचे तब्बल दहा नेते कॉंग्रेसने आपल्या पक्षात घेतल्यानं भाजपला फटका बसला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कोलारसचे भाजप आमदार वीरेंद्र रघुवंशी आणि भाजपचे माजी आमदार भंवर सिंह शेखावत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांनी पक्ष बदलण्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील वाढते महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते काँग्रेसवासी झालेत आहे.

भाजपचे माजी आमदार भवर सिंह शेखावत यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असून या जागेवरून ते पुन्हा एकदा निवडणूक लढवू शकतात. झाशीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले सुजान सिंग बुंदेला यांचे पुत्र चंद्रभूषण सिंग बुंदेला उर्फ ​​गुड्डू राजा यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

याशिवाय, डॉ.आशिष अग्रवाल, आशु रघुवंशी, छेडीलाल पांडे, शिवम पांडे, अरविंद धाकड, डॉ.केशव यादव आणि महेंद्र प्रताप सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हे पक्षप्रवेशावेळी बोलतांना म्हणाले की, भाजपने मध्य प्रदेशला भ्रष्टाचाराचे राज्य बनवले आहे. ‘पैसे द्या आणि काम मिळवा’ अशी भ्रष्ट व्यवस्था राज्यात निर्माण केली. राज्यात्या भगिनींना त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून मुख्यमंत्री 1000 रुपये देतात. त्यांची 18 वर्षांची पापे धुऊन निघतील असे त्यांना वाटतं. मध्य प्रदेशचे भविष्य वाचवायचे असेल तर जनतेने त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. ते वेगवेगळी अमिषं दाखवतील, पण निवडणुकीत शिवराजजी जनता तुम्हाला खूप प्रेमाने निरोप देणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज