Download App

इराण-इस्रायल संघर्ष! भारतात पेट्रोल अन् डिझेलच्या किंमती कमी होणार?, सरकारने काय दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती देशांच्या कच्च्या तेलाने प्रतिबॅरल 78 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती.

  • Written By: Last Updated:

Petrol And Diesel Price : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार का यावर उत्तर दिलं आहे. जेव्हापासून इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती देशांच्या कच्च्या तेलाने प्रतिबॅरल 78 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या संपूर्ण प्रकरणावर देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितल की, पश्चिम आशियातील वाढत्या संकटामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, भारत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलर्सवरून 78 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत.

सोने चमकले! किंमतींनी गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या काय आहेत नवे दर

पश्चिम आशियात तणाव वाढल्यास ऊर्जेच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो, असं पेट्रोलियम मंत्री म्हणाले. परंतु, अद्याप पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही आणि जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ आहे. पुरी म्हणाले की, तेलाचा तुटवडा नाही आणि भारताला आपल्या गरजा पूर्ण करण्याचा विश्वास आहे.

इस्रायलच्या निशाण्यावर होर्मुझ

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल इराणमधील तेल किंवा आण्विक प्रकल्पांना लक्ष्य करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, इराण इस्त्रायलवर थेट हल्ला करून किंवा जगातील सर्वात महत्त्वाचे तेल वाहतूक केंद्र असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून प्रत्युत्तर देऊ शकते. त्यामुळे तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सर्व प्रमुख तेल उत्पादक देश – सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती या मार्गाने तेल निर्यात करते. फक्त सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये पाइपलाइन आहेत ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या प्रभावामुळे प्रभावित होणार नाहीत.

पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार?

तेलाच्या किमती कमी होण्याबद्दल पुरी यांना विचारले असता ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बाजारावर आधारित असतात आणि पेट्रोलियम कंपन्या किंमतीबाबत निर्णय घेतात. परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे ते म्हणाले. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

LIVE: ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट आघाडीवर, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसीचा ट्रेंड

 

follow us