Download App

मोदी सरकारचा मोठा निर्णय; UPI वर पेमेंट घेणे ठरणार फायद्याचं; 2 हजारांपर्यंतच्या व्यवहारावर मिळणार इंसेंटिव्ह

UPI payments घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता UPI वर पेमेंट घेणे ठरणार फायद्याचं ठरणार आहे.

Incentives will be given on transactions up to Rs 2,000 UPI payments : युपीआय पेमेंट्स घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता UPI वर पेमेंट घेणे ठरणार फायद्याचं ठरणार आहे. कारण आता युपीआय व्यवहारावर इंसेंटिव्ह मिळणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने आता युपीआय व्यवहारावर इंसेंटिव्ह देणार आहे.

मोदी सरकारच्या काळात इडीचा फक्त धाक; १० वर्षात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांवर गुन्हे, शिक्षा मात्र दोघांनाच

यासाठी सरकारने अर्थिक वर्ष 2024-25 साठी सुरू केलेल्या या योजनेसाठी 1500 कोटी रूपयांची तरतुद केली आहे. त्यानुसार व्यक्ती कडून व्यापारी आणि मर्चंट यांना दिल्या जाणाऱ्या पेमेंट्सना विशेषत: कमी किमतीचे व्यावहार जास्तीत जास्त युपीआयवरून करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

कुणाला होणार फायदा?

यो योजनेनुसार 2 हजारांपर्यंतच्या युपीआयवरून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर इंसेंटिव्ह दिला जाणार आहे. याचा फायदा विशेषत: छोट्या व्यापाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे आता छोट्या व्यापाऱ्यांना 2 हजारांपर्यंतच्या युपीआयवरून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर प्रति व्यवहार 0.15 टक्के इंसेंटिव्ह मिळणार आहे. दर तीन महिन्यांना यातील 80 टक्के इंसेंटिव्ह संबंधित व्यापाऱ्याच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे. तर उर्वरित 20 टक्के हा तेव्हाच जमा केला जाईल जेव्हा बॅंकेच्या तांत्रिक अडचणी 0.75 टक्क्यांनी कमी आणि सिस्टम अपटाइम 99.5 टक्क्यांच्यावर असेल.

प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी! ‘स्टार परिवार महामिलन’ या भव्य कार्यक्रमात लोकप्रिय मालिका येणार एकत्र

यामागे सरकारचा एकमेव हेतू असा आहे की, दुकानदारांसाठी व्यवहार सुलब व्हावेत, सुरक्षित आणि जलद पेमेंट्स व्हावेत. सरळ बॅंक खात्यावर पैसे यावेत. डिजिटल व्यवहार वाढतील. त्यातून कर्ज मिळण्यास मदत होईल. गाव खेड्यांपर्यंत युपीआय पोहचवणे, सिस्टम सुरू ठेवणे, 20,000 कोटींची डिजिटल देवाण-घेवाण पुर्ण करणे. त्यामुळे आता छोट्या व्यापाऱ्यांसाठी UPI वर पेमेंट घेणे फायद्याचं ठरणार आहे.

follow us