प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी! ‘स्टार परिवार महामिलन’ या भव्य कार्यक्रमात लोकप्रिय मालिका येणार एकत्र

‘Star Parivar Mahamilan’ brings together popular serials of Star Plus’ channel : ‘स्टार प्लस’ वाहिनीवर नेहमीच दर्जेदार मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले जातात. लक्षवेधक कथाकथन, भव्य समारंभ आणि ताज्या आशयाच्या, आकर्षक मालिकांमुळे ही वाहिनी प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात अग्रेसर आहे. चाहत्यांना जागी खिळवून ठेवण्याकरता ओळखली जाणारी ही वाहिनी प्रेक्षकांकरता सतत काहीतरी नवीन आणि चित्तवेधक कार्यक्रम पेश करत असते.
महाराष्ट्राचं राजकारणच खास! आधी PA आता थेट आमदार अन् मंत्री; जाणून घ्या, टर्निंग पाइंट
आता, ‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांकरता आणखी एक नवा शानदार कार्यक्रम सादर करणार आहे- ज्या कार्यक्रमाचे नाव आहे स्टार परिवार महामिलन! या वाहिनीने या कार्यक्रमाचा अधिकृतपणे प्रोमो नुकताच प्रदर्शित केला आहे, ज्याची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या भव्य उत्सवात ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील अनेक मालिकांमधील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेली पात्रे एकत्र येत असून या कार्यक्रमाद्वारे उत्कट नाट्य, भावभावना आणि अविस्मरणीय क्षण प्रेक्षकांना अनुभवता येईल.
Top Companies : टाटा-बिर्लांनाही टाकलं मागं; कुठली आहे ही कंपनी?, टॉप 500मध्ये मिळवले स्थान
‘स्टार परिवार महामिलन’ या कार्यक्रमाद्वारे ‘स्टार प्लस’ वाहिनी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या मालिकांना एकत्र आणून एका अपूर्व अशा भव्य उत्सवाची निर्मिती करत आहे. अनुपमा, ये रिश्ता क्या कहलाता है, उडने की आशा, गुम है किसीके प्यार में, अॅडव्होकेट अंजली अवस्थी, पॉकेट में आसमान, जादू तेरी नजर, झनक आणि इस इश्क का रब्ब रखा या मालिकांचा समावेश या उत्सवात केला जात असून, या विशेष कार्यक्रमात नाट्य, भावभावना, वेधक आशय असून या कार्यक्रमाद्वारे चाहत्यांच्या वाट्याला नक्कीच अविस्मरणीय क्षण येतील, कारण या अद्वितीय कथांतून एक अफलातून अनुभव निर्माण होईल! शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा पासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरू होणारा ‘स्टार परिवार महामिलन’ कार्यक्रम बघायला विसरू नका!