Download App

Uflex Limited च्या 64 ठिकाणी आयटीचे छापे, बनावट बिलांचा आरोप

नोएडा : आयकर विभागाने (Income Tax Department) मंगळवारी युफ्लेक्स लिमिटेडच्या (Uflex Limited)64 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. (IT Raid On Uflex Limited) दरम्यान, युफ्लेक्स शेअर्स NSE वर 473 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या आधीच्या 486.10 रुपयांच्या बंदच्या तुलनेत सुमारे 2.50 टक्क्यांनी घसरले.

1985 मध्ये स्थापन झालेली युफ्लेक्स ही भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय लवचिक पॅकेजिंग आणि सोल्युशन्स कंपनी आहे. (IT Raid) त्याचे मुख्यालय नोएडा येथे आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाने हे छापे टाकले कारण कंपनीवर बनावट बिले जारी केल्याचा आरोप होता. मात्र, अद्याप प्राप्तिकर विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही (Q3) मध्ये, कंपनीने 3,496 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न नोंदवले, जे वर्षभरात 0.6 टक्क्यांनी वाढले. या तिमाहीत करानंतर निव्वळ तोटा रु.85 कोटी होता. FY22 च्या तिसऱ्या तिमाहीत, युफ्लेक्स ने 314 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला.

Tags

follow us