Download App

काँग्रेस खासदाराच्या घरी सापडलं 200 कोटींचं घबाड; मशीनने पैसे मोजून ट्रकमधून नेल्या नोटा…

Congress MP Dheeraj Sahu : मागील काही दिवसांपासून आयकर विभागाने छाप्यांचा जोरदार धडाका सुरु केला आहे. अशातच काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहु (Dheeraj Sahu) यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने (Income Tax) छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल 200 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्याना चक्क ट्रकमधून नेण्यात आल्या आहेत.

आयकर विभागाच्या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही एक्सवर पोस्ट शेअर करीत सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशवासी इन नोटों के ढेर को देखें और फिर इनके नेताओं के ईमानदारी के ‘भाषणों’ को सुनें… 😂😂😂 जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है।” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी पोस्टमध्ये म्हटले आहेत.

नऊ कपाटांमध्ये रोख रक्कम :
धीरज साहू हे मोठे उद्योगपती आहेत. यासोबतच ते मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीशी संबंधित आहेत. आयकर विभागाने झारखंड, ओडिशा आणि बंगालमधील समूहाच्या 10 ठिकाणी छापे टाकले. बलदेव साहू कंपनीच्या बोलंगीर कार्यालयापासून 30 किमी अंतरावर असलेल्या सातपुडा कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकून 200 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! पहिल्या आठवड्यात जमवला 536.3 कोटींचा गल्ला

छाप्यादरम्यान, 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा बंडलमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. एवढी मोठी रोकड सापडल्यानंतर आयकर विभागाच्या पथकाला मशिन वापरून नोटा मोजाव्या लागल्या आहेत. छाप्यानंतर पैशांच्या 157 बॅगमध्ये भरल्या नंतर बॅग कमी पडल्यावर नोटा बॅगमध्ये भरून ट्रकमध्ये टाकल्या आणि बॅंकेत नेल्या आहेत.

Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला

बलदेव साहू आणि ग्रुप ऑफ कंपनीज ही पश्चिम ओडिशातील सर्वात मोठी देशी दारू उत्पादक आणि विक्रेत्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीत काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्य राजकिशोर साहू, स्वराज साहू आणि इतर कुटुंबीयांचा समावेश आहे. ओडिशाचा व्यवसाय त्यांचे भाऊ संजय साहू आणि दीपक साहू सांभाळतात.

बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (BDPL) व्यतिरिक्त, धीरज साहूच्या कुटुंबाच्या मालकीच्या या समूहात बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बेव्हरेज लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

follow us