Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : काल राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. या प्रकारावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. तसेच नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचेही स्पष्ट सांगून टाकले. भाजपाच्या या बदललेल्या भूमिकेवरही विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांचे पत्र ट्विट करत जोरदार प्रहार केला आहे.

अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अश एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहितच नव्हतं. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार,ईडी फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे.. यांचा देश हा असा आहे. हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी.. जात मांजराची.. अशा शब्दांत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut : अजितदादा अन् भाजपलाच सांगा; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला

फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र

नवाब मलिक यांनी आज विधानसभा परिसरात येऊन कामकाजात सहभाग घेतला. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांना हा अधिकार आहे. त्यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक शत्रुत्व किंवा पूर्वग्रह नाही, मात्र त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले आहेत ते पाहता त्यांचा महायुतीत समावेश करणे योग्य होणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, असं पत्र फडणवीसांनी पवारांना लिहिलं.

दरम्यान, या पत्रावरून राजकारणात गदारोळ उठला असून अजित पवार गटाचे नेतेही भाजपवर टीका करू लागले आहेत. यामुळे वाद आणखी वाढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या वादाचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पडणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल. परंतु, राज्यातील जनता आणि विरोधकांचा मूड पाहता भाजपाने तत्परता दाखवत पत्र लिहिण्याची खेळी केली. त्यामुळे विरोधकांनी मिळालेली आयती संधी काढून घेण्यात भाजप यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण करण्याची संधी विरोधकांना मिळणार नाही.

Sushama Andhare : सत्तेपेक्षा देश मोठा ही देवेंद्रभाऊंना झालेली उपरती, अजितदादांना सत्तेत घेतांना विवेक कुठे होता?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube