मुंबई : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. यामध्ये उज्ज्वला योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.
प्रति एलपीजी सिलेंडर 200 रूपये सबसिडी असणार आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. नव्या अर्थिक वर्षात ही सबसिडी देण्यात येणार आहे.
त्यामुळे आता सिलेंडरच्या किंमती काही प्रमाणात कमी होणार आहेत. तर सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले का, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे.
‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र
शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. उज्ज्वला योजने अंतर्गत वर्षभरात 12 एलपीजी सिलेंडर देण्यात येतात. त्यावर ही सबसिडी प्रति एलपीजी सिलेंडर 200 रूपये असणार आहे. म्हणजे एका वर्षात लाभार्थ्यांना 2400 रूपायांपर्यंत अनुदान मिळणार आहे.