Corona : चिंता वाढली, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 1700 च्या वर, तिघांचा मृत्यू
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यातमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे राज्याची चिंता वाढली असून शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान राज्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी सांगायची झाली तर शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात 343 रूग्ण आढळून आले. तर राज्यातील एकूण सक्रिय रूग्ण 1763 आहेत. तर 8,65,71,673 एवढ्या लोकांच्या आतापर्यंत तपासन्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने सकारात्मक आले आहेत.
राज्यात शुक्रवारी आढळून आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण हे पुणे शहरात आहेत तर त्यानंतर मुंबई आणि ठाण्याचा नंबर लागतो. त्यामुळे पुणे शहराची चिंता जास्त वाढली आहे. त्यादरम्यान राज्यात H3N2 या विषाणुने देखील आपले हात पाय पसरायला सुरूवात केल्याने राज्यावर दुहेरी संकट घोंगावत आहे.
अनेक राज्यांत पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान आता कोरोना झाल्यास कोणती औषधं घ्यावी आणि कोणती नाही याविषयी देखील आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या देशात प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी लोपीनविर-रिटोनावीर, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आयव्हरमेक्टिन, मोलनुपिराविर, फॅविपिरावीर, अझिथ्रोमायसिस आणि डॉक्सीसायक्लिन यांसारख्या औषधांचा वापर करण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं आहे.
त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्मा थेअरीचा वापर टाळण्याचे देखील सांगितले आहे. हे सर्व बदल आणि कोरोना संदर्भात नव्या गाईड लाईन्स जारी करण्यासाठी 5 जानेवारीला एआयआयएमएस, आयसीएमआर आणि कोविडच्या टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये डॉक्टरांना अॅंटीबायोटीक आणि प्लाझ्मा थेअरीचा वापर टाळण्याचे देखील सांगितले गेले. त्यामुळे आता आरोग्य मंत्रालयाने कोरोना संदर्भात नव्या गाईड लाईन्स जारी केल्या आहेत.
या औषधांचा वापर टाळण्यामागील कारणं म्हणजे या अॅंटीबायोटीकमुळे रूग्ण तातपुरते कोरोना मुक्त जरी होत असले तरी देखील त्याचे त्यांच्या शरीरावर दुरगामी परिणाम होतात. इतर आजार बळावण्याची शक्यता असते. अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती देखील यामुळे क्षीण झाली असून पोस्ट कोविडच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.