Download App

Manmohan Singh : पटेल यांचा एक नकार अन् देशाच्या राजकारणात झाली डॉ. मनमोहन सिंग यांची एन्ट्री…

Manmohan Singh B’day : 1991 चं वर्ष. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या वातावरणात 10 व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. राजकारणातून निवृत्त होऊन घरी गेलेले पी.व्ही. नरसिंहराव पुन्हा सक्रिय झाले होते. नुसते सक्रियच नाही तर पंतप्रधान देखील झाले होते. पण त्यांच्यासमोर सुखद असं कोणतचं चित्र नव्हतं. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. परकीय गंगाजळी आटली होती. अशा या दिवळाखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला पुन्हा सावरण्याचं सर्वात मोठ आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्यामुळे नरसिंहराव ज्याला अर्थव्यवस्थेचे चांगले ज्ञान आहे अशा व्यक्तीच्या शोधात होते. (Inder Prasad Govardhanbhai Patel’s refusal, Manmohan Singh was nominated for the post of Finance Minister)

त्यांचा शोध येऊन संपला डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत.

पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ अशा संस्थांमधून अर्थशास्त्रात शिकून आलेले मनमोहनसिंग त्यावेळी युजीसीचे चेअरमन होते. त्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषद, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रोफेसर, विदेश व्यापार मंत्रालयाचे सल्लागार, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक, अर्थ मंत्रालयात सचिव, रिझर्व्ह बँकेचे संचालक, भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, दक्षिण आयोगाचे महासचिव, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.

देवेगौडांच्या पक्षाला घरघर! भाजपसोबतची युती महागात पडणार? बड्या नेत्यांची खलबत

एवढ्या प्रचंड शिकलेल्या आणि वेगवेगळ्या उच्च पदांवर काम करणाऱ्या माणसाने भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणले. उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण स्विकारुन देशाला संधींचे नवीन दार उघडून दिले. त्यांच्यामुळेच आपण आजचा अर्थिक दिवस बघू शकतो असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही. त्यांच्या अर्थ क्षेत्रातील योगदानावर लिहिणे म्हणजे, साक्षात देवाची आरती म्हणण्यासारखेच होईल. हेच पुढे देशाचे पंतप्रधानही झाले.

पण तुम्हाला माहिती आहे का? नरसिंहराव यांचे अर्थमंत्री म्हणून मनमोहनसिंग यांना पहिले प्राधान्य नव्हतेच. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून निवृत्त झालेल्या इंदर प्रसाद गोवर्धनभाई पटेल यांना पीव्ही नरसिंह राव यांनी अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर दिली होती. पण पटेल यांनी माजी पंतप्रधानांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. माझ्यापेक्षा डॉ. मनमोहनसिंग या पदाला जास्त योग्य प्रकारे न्याय देऊ शकतील, असे सांगत त्यांनी अर्थमंत्रीपदासाठी मनमोहनसिंग यांचे नाव सुचविले.

उर्जित पटले म्हणजे पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप; मोदींचे नाव घेत गर्ग यांचा मोठा दावा

पटेल यांच्या सुचनेनुसार, पंतप्रधान नरसिंहराव यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी डॉ. अलेक्झांडर यांनी मनमोहनसिंग यांच्यापुढे अर्थमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. बऱ्याच चर्चांनंतर आणि कामाचे स्वरुप ठरल्यानंतर मनमोहनसिंग यांनी हा प्रस्ताव स्विकार केला आणि त्यांची देशाच्या राजकारणात अर्थमंत्री म्हणून एन्ट्री झाली. असं म्हणतात की 2004 मध्ये अॅक्सिडेंटली मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली. मात्र 1991 मध्ये तेवढ्या अपघाती आणि पटेल यांच्या नकारामुळे मनमोहनसिंग यांची अर्थमंत्रीपदावर वर्णी लागली होती.

Tags

follow us