Mono Rail : राज्याची राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावर मोनोरेलमध्ये (Mono Rail) तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल जागीच थांबली. तब्बल दोन तासांनंतर मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. माहितीनुसार, चेंबूर ते भक्ती पार्क या मार्गावर धावणाऱ्या मोनोरेलमध्ये काही तंत्रिक बिघाड झाल्याने ट्रेन जागीच थांबली होती. ही ट्रेन एसी असल्याने ट्रेनचे दरवाजे आणि खिडक्या बंद होते. ट्रेन बंद झाल्याने ट्रेनमधील एसी बंद पडला त्यामुळे अनेक प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे ट्रेनमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाला होता.
प्रवासी या ट्रेनमध्ये एक ते दीड तासांपासून अडकले होते आणि त्यांच्या सुटकेसाठी मुंबई महापालिकेचे बचाव पथक प्रयत्न करत होते. बचाव पथकाकडून सुरुवातीला काच फोडून आतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा नियोजन सुरु होतं मात्र आत असलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने एका प्रवाशाने काच फोडली ज्यामुळे बाहेरची हवा आत जाण्यास मार्ग मिळाला.
मोठी बातमी, पावसामुळे झेलम, डेक्कन एक्सप्रेससह 14 रेल्वे रद्द; पहा संपूर्ण लिस्ट
तर दुसरीकडे काचेच्या जवळ थांबू नये असं आवाहन बचाव पथकाकडून करण्यात येत होते. यानंतर मुंबई अग्रिशमन दलाने मदत कार्य सुरु करत दोन ठिकाणच्या काचा फोडल्या आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढले.