Download App

देवेगौडांच्या पक्षाला घरघर! भाजपसोबतची युती महागात पडणार? बड्या नेत्यांची खलबत

बंगळूरु : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला भाजपसोबतची युती महागात पडण्याची शक्यता आहे. भाजपसोबतची युती जाहीर झाल्यानंतर पक्षात बराच अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे, तर आणखी अनेक मोठी नावे राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. यात बहुतांश अल्पसंख्याक समाजातील नेत्यांची नावे आहेत. (Janata Dal (Secular) party leaders expressed displeasure over the decision to join the NDA)

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या अल्पसंख्याक नेत्यांची रविवारी (24 सप्टेंबर) बंगळुरूमध्ये एक बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या युतीच्या निर्णयावर आणि त्यांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यात आली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

“तु भेटायला ये, नाहीतर….” : मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करुन तरुणाने आमदाराच्या घरातच घेतला गळफास

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे कार्याध्यक्ष एनएम नबी यांच्या अध्यक्षतेखाली या पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रवक्ते नूर अहमद, मोहिद अल्ताफ आणि नसीर उस्ताद यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षात कायम राहण्याचा किंवा राजीनामा देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील सर्व अल्पसंख्याक कार्यकर्त्यांची मते घेतली जातील, असा निर्णय या बैठकीत नेत्यांनी घेतला.

यासाठी कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून तेथील अल्पसंख्याक कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली जाणार आहे. काही दिवसातच दुसरी बैठक होणार आहे. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच हे सर्व नेते पक्ष सोडण्याचा किंवा राजीनामा द्यायचा की नाही, याचा निर्णय घेतील, असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा; ब्रिजभूषण सिंह संतापले

उपाध्यक्षांनी यापूर्वीच दिला राजीनामा

याआधी रविवारी जनता दल (धर्मनिरपेक्ष) कर्नाटकचे उपाध्यक्ष सय्यद शैफुल्ला यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. यावेळी ते म्हणाले होते, “ जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने अशा पक्षाशी हातमिळवणी केली आहे जो समाज आणि जातींमध्ये तेढ निर्माण करते. पक्षातील धर्मनिरपेक्ष नेते या निर्णयाला विरोध करत आहेत.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) नुकतीच कर्नाटकमध्ये भाजपसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही औपचारिकपणे सामील झाला आहे. पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली.

Tags

follow us