माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा; ब्रिजभूषण सिंह संतापले

  • Written By: Published:
माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा; ब्रिजभूषण सिंह संतापले

Brijbhushan Sharan Singh : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात लोकसभेबरोबरच (Lok Sabha) अनेक राज्यांच्या निवडणूका होत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिकीट वाटपाबाबत अद्याप खलबते सुरू झाली नसली तरी अनेक नेते मतदार संघावर आपापले दावे ठोकत आहेत. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांनी आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलं. २०२४ च्या निवडणूकीत मोदीचं पुन्हा सत्तेत विराजमान होतील, असं सांगतं माझं तिकीट कोण कापणार? असा सवाल त्यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर देशातील नामवंत महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. हे प्रकरण चांगलचं तापलं होते. जवळपास दोन महिने हे आंदोलन दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू होतं. त्यावेळी ब्रिजभूषण चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा एकदा ब्रिजभूषण हे चर्चेत आले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ब्रिजभूषण सिंह यांना लोकसभेच्या तिकीटाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

धनगर आरक्षणाबाबत भाजपच्या आदिवासी मंत्र्यांचे मोठे विधान; सरकारची होणार कोंडी? 

सध्या ब्रिजभूषण सिंह हे भाजपच्या तिकीटावर उत्तर प्रदेशातील बाराबंकी मतदार संघाचे प्रतिधित्व करतात. आज ते बाराबंकीत एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एका पत्रकाराने त्यांना तुमचे तिकीट कापले जात आहे का ? याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे, असा सवाल केला. यावर बोलतांना ब्रिजभूषण सिंह संतापले होते. आणि त्यांनी विचारले माझे तिकीट कोण कापणार? फक्त नाव सांगा, असे उत्तर दिले.

पत्रकारांनी प्रश्न विचारताच, कोण माझे तिकीट कापणार? फक्त नाव सांगा आणि हिम्मत असेल तर कापून दाखवा. तुम्ही माझे तिकीट कापणार का? असा उलट प्रश्न ब्रिजभूषण यांनी केला. तसेच सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढील सुनावणी ७ आक्टोंबरला
दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी अनेक दिवस निदर्शने केली. या आंदोलनात ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडूही सहभागी झाले होते. त्यांच्याविरोधात आरोप निश्चित प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी ७ आक्टोंबरला होणार आहे.

ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याची एकही संधी सोडली नाही, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube