“तु भेटायला ये, नाहीतर….” : मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करुन तरुणाने आमदाराच्या घरातच घेतला गळफास

“तु भेटायला ये, नाहीतर….” : मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करुन तरुणाने आमदाराच्या घरातच घेतला गळफास

लखनऊ : उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. भाजप आमदार योगेश शुक्ला यांच्या शासकीय निवासस्थानी एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. श्रेष्ठ तिवारी (24 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शुक्ला यांच्याकडे माध्यम व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. प्राथमिक तपासानुसार, प्रेयसीसोबत झालेल्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Youth committed suicide by hanging himself at the official residence of BJP MLA Yogesh Shukla due to an argument with his girlfriend)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, श्रेष्ठ तिवारी हा बाराबंकीच्या हैदरगडचा रहिवासी होता, तो आमदार योगेश शुक्ला यांच्याकडे माध्यम व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. कामानंतर तो त्यांच्याच शासकीय निवासस्थानी मुक्कामासाठी असायचा. रविवारी रात्री प्रेयसीसोबत झालेल्या वादातून श्रेष्ठने आत्महत्या केली.

Chandrashekhar Bavankule यांची ‘विद्वत्ता’ समोर आलीय; ‘त्या’ वक्तव्यावरून नाना पटोलेंनी साधला निशाणा

घटनेच्या वेळी प्रेयसी फ्लॅटच्या गेटवरच उभी होती. तिच्याशी बोलतानाच त्याने गळफास घेतला. याबाबत प्रेयसीनेच पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि दरवाजा तोडून मृतदेह खाली उतरवला. तपासादरम्यान, खोलीतून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. फॉरेन्सिक टीमनेही खोलीची तपासणी केली.

बावनकुळेंची चहापानाच्या वक्तव्यावरून सारवासारव; म्हणाले, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास…’

दरम्यान, यावेळी प्रेयसीने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. प्रेयसी अलीगंजची रहिवासी आहे. दोघेही गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते नियमितपणे भेटायचे, फोनवर आणि व्हिडीओ कॉलवर बोलायचे. इतर दिवशी आमदार शुक्ला यांच्याकडे नोकरी करणारे विविध तीन ते चार जण फ्लॅटमध्ये राहायचे. पण त्यादिवशी श्रेष्ठ एकटाच फ्लॅटवर होता. त्यामुळे तो प्रेयसीला भेटण्यासाठी बोलवत होता.

यादरम्यान, दोघांमध्ये वादावादी झाली. त्यातून “तु आली नाही तर बघ”, असं म्हणत त्याने धमकी दिली. यावेळी गेटवर उभ्या असलेल्या प्रेयसीला त्याने व्हिडिओ कॉल केला आणि तिच्यासमोरच गळफास घेतला. या दरम्यान स्क्रीनशॉटही घेतला होता. सध्या प्रेयसीसोबत झालेल्या वादातून श्रेष्ठ तिवारीने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांचे मत आहे.  श्रेष्ठ आणि त्याच्या प्रेयसीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube